Homeताज्या बातम्याबीड

पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे यांना झेड प्लस सुरक्षा देवून हत्येच्या कटामागील मुख्य सूत्रधार शोधा – वैभव स्वामी

सांगलीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक तथा राज्य संघटक संजय भोकरे यांच्या हत्येचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणामुळे भोकरे क

जाटनांदूर येथे गुजर समाजाच्या वतीने महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी
अंजनवती येथील येडे बंधुंचा संसार वादळीवार्‍यासह पावसाने उद्ध्वस्त !पत्रे उडाले, भिंती पडल्या, गृहोपयोगी साहित्यासह खतही भिजले !तातडीने नुकसानभरपाईची मागणी-डॉ.गणेश ढवळे
वक्फ मंडळात तोंड बघून कामे केली जात आहेत का? महत्त्वाच्या प्रकरणांकडे दुर्लक्षदहा दिवसांत मंडळ बरखास्त करा, अन्यथा जनआंदोलन-शेख नदीम



सांगलीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक तथा राज्य संघटक संजय भोकरे यांच्या हत्येचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणामुळे भोकरे कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेवून या घटने मागील मुख्य सूत्रधारांना अटक करून भोकरे साहेब यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या नेतृत्वाखालील बीड जिल्हा शाखेच्या वतीने  जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आली.
सांगली पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना 5 दिवसापूर्वी अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले, चार जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. मात्र अजूनही मुख्य सूत्रधारांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी आणि मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करून त्यांचे चेहरे समोर आणावेत. पोलिसांनी या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालू नये अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे बीड जिल्हा शाखेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना देताना पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष शेख आयेशा, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष शेख ताहेर, जिल्हा सहसचिव अमोल शिंदे,सदस्य शेख एजाज वडवणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS