Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

तुलसी इंग्लिश स्कूलचा पदवी समारंभ उत्साहातशौर्य डोंगरेसह यूकेजीच्या विद्यार्थ्यांचा गौरव

Oplus_16908288 कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षम होणे आवश्यक आहे. या दृष्टीने तुलसी शैक्षणिक स

कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसर्‍यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोधजिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने सत्कार
स्ट्रक्चरल ऑडिटची नाटकं बंद करा, मोडकळीस आलेल्या शाळांची तातडीने दुरुस्ती करा-डॉ.गणेश ढवळेन्यायालयाच्या निर्देशांकडे तीन वर्षांपासून दुर्लक्ष; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप
हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Oplus_16908288



कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षम होणे आवश्यक आहे. या दृष्टीने तुलसी शैक्षणिक समूह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
बीड येथील तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवार (दि. 21) रोजी इयत्ता यूकेजी वर्गातील विद्यार्थ्यांचा पदवी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुनिल डोंगरे, डॉ. विजयकुमार बांदल, डॉ. सुनिल जोंधळे तसेच व्हाईस प्रिन्सिपल सय्यद सिद्दिकी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले की, संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सुसंस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर देत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी सक्षम आणि जबाबदार नागरिक बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पदवी समारंभात इयत्ता यूकेजी वर्गातील शौर्य सुनील डोंगरे याच्यासह सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. संस्थेचे संचालक प्रा. प्रदीप रोडे हे शाळेच्या प्रगतीकडे बारकाईने लक्ष देत असून, प्रिन्सिपल उमा जगतकर या व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढवत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रिन्सिपल उमा जगतकर यांनी केले. सूत्रसंचालन शेख सरताज यांनी, तर आभार प्रदर्शन वंदना राठोड यांनी केले. पदवी समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी मोलाचे योगदान दिले.

COMMENTS