मुंबई / प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या वादळी चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि नाट्यमय घडामोडींना अखे
मुंबई / प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या वादळी चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि नाट्यमय घडामोडींना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटातील सर्व 6 बंडखोर खासदारांनी दि. 21 रोजी अधिकृतपणे पक्षांतराची घोषणा केली होती. वाय. बी. सेंटर येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्व खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. या ऐतिहासिक फुटीमुळे ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीनंतरचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
’ऑपरेशन टायगर’ आणि दिल्लीतील ते ’गुप्त’ मिशन
संपूर्ण पक्षांतराची संहिता 16 जून रोजीच दिल्लीत लिहिली गेली होती. अत्यंत गोपनीय पध्दतीने झालेल्या या मोहिमेचे सविस्तर तपशील आता समोर आले आहेत. 16 जून रोजी खासदार संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय दिना पाटील हे 6 खासदार देशाच्या विविध भागांतून अचानक दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी नोएडामधील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे देखील दिल्लीत दाखल झाले. 17 जून रोजी सकाळी 7:00 वा. खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. 17 जून सकाळी 10:20 वा. उर्वरित 5 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन एक पत्र सुपूर्द केले. यामध्ये आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचे सांगत सभागृहातील आसनव्यवस्था बदलण्याची अधिकृत विनंती केली. या भेटीनंतर सर्व खासदार वेगवेगळ्या विमानाने चेन्नई, वाराणसी, पुणे आणि मुंबईला रवाना झाले.
खा. संजय राऊतांचे दावे ठरले फोल
खासदार गैरहजर राहिल्याने ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. गैरहजर असलेले पाच खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले आहेत. एक खासदार ठाकरेंसोबत फोनवर बोलत आहे, असा दावा राऊत यांनी केला होता. मात्र, त्याच वेळी खासदार संजय जाधव हे शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेताना कॅमेर्यात कैद झाले. हा केवळ बिगर-राजकीय सुसंवाद असल्याचा दावा खासदारांनी केला असला, तरी आजच्या पक्षप्रवेशाने या दाव्यांमधील हवा काढून घेतली आहे.

COMMENTS