Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहूर गडावर घटस्थापनेने चैत्र नवरात्र महोत्सवाची सुरुवात

माहूर : माहूर गडावर नववर्ष पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चैत्र शुद्ध प्रतिपदेनिमित्त गुढी उभारून हजारो भाविकांच्या उपस्थितीत घटस्थापनेने चैत्र नवरात्

स्मार्ट मीटर बसले, पण महावितरणचा ‘स्मार्ट’ कारभार कोठे? ग्राहकांवर कर्मचार्‍यांची दमबाजी सुरूच!
रानडुक्कराच्या हल्ल्यात जखमी महिलेस 5 लाखांची मदत
25 वर्षांची अखंड सेवा : ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई’ उपक्रमाचा शुभारंभ

माहूर : माहूर गडावर नववर्ष पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चैत्र शुद्ध प्रतिपदेनिमित्त गुढी उभारून हजारो भाविकांच्या उपस्थितीत घटस्थापनेने चैत्र नवरात्र महोत्सवाला विधिवत प्रारंभ झाला.
यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा संस्थानचे अध्यक्ष नरेंद्र ब्रंम्हे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव जेनिथचंद्रा दोंतुला, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उपाध्यक्ष किरणकुमार भोंडवे, तसेच तहसीलदार तथा कोषाध्यक्ष अभिजित जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. पुजारी चंद्रकांत भोपी व भवानीदास भोपी यांच्या हस्ते श्री रेणुका मातेला पंचामृत अभिषेक, सिंदूर लेपन, मळवट भरून महावस्त्र परिधान करण्यात आले. यानंतर खणानारळाची ओटी अर्पण करून पारंपरिक अलंकार चढविण्यात आले. पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवून महाआरती व कुमारी पूजन करण्यात आले. त्यानंतर परिसरातील देवतांचे पूजन करून छबीना काढण्यात आला. या प्रसंगी विश्वस्त संजय कान्नव, अरविंद देव, विनायक फांदाडे, बालाजी जगत, आशिष जोशी, दुर्गादास भोपी व पुजारी शुभम भोपी गाभार्‍यात उपस्थित होते. या धार्मिक विधीचे पौरोहित्य वे. शा. सं. रविंद्र कान्नव, अनिल कान्नव व मनोज बनसोडे यांनी केले. नवरात्र उत्सव काळात भाविकांसाठी सुलभ दर्शनरांग, पिण्याचे शुद्ध पाणी, उन्हापासून संरक्षणासाठी मंडप तसेच परशुराम मंदिर परिसरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक विजय राऊत यांनी दिली.

COMMENTS