Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

25 वर्षांची अखंड सेवा : ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई’ उपक्रमाचा शुभारंभ

नांदेड : गुढीपाडव्याच्कया पावन मुहूर्तावर समाजसेवेची परंपरा जपत धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने राबविण्यात येणार्‍या ‘लोकनेते गोपीनाथराव मु

रानडुक्कराच्या हल्ल्यात जखमी महिलेस 5 लाखांची मदत
माहूर गडावर घटस्थापनेने चैत्र नवरात्र महोत्सवाची सुरुवात
काम करणार्‍याला कायम डावलायचं? अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांचा राजकीय वनवास भाजपचा अन्याय की राजकीय गणित ?

नांदेड : गुढीपाडव्याच्कया पावन मुहूर्तावर समाजसेवेची परंपरा जपत धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने राबविण्यात येणार्‍या ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई’ या उपक्रमाच्या 25 व्या वर्षाची गुरुवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली. भाजपा महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान मोर्चाचे राम अय्यर होते, तर भाजपा उपाध्यक्ष बागडया यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमामुळे वाघी-नाळेश्वर सर्कल परिसरातील सुमारे 16 गावांतील प्रवासी तसेच मिलरोड वसाहतीतील नागरिकांना उन्हाळ्यात शीतपाण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता समाजसेवा करण्याचा वसा जपणार्‍या अ‍ॅड. ठाकूर यांच्या या कार्याचे परिसरात विशेष कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे, कै. गोपालसिंह ठाकूर, मातोश्री कै. वनमाला ठाकूर, कै. अ‍ॅड. श्याम जाधव, कै. बिरजू यादव आणि कै. लक्ष्मीबाई भुसेवाड यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात ड. दिलीप ठाकूर यांनी या उपक्रमामागील सेवा भावना आणि सातत्याची भूमिका मांडली. अध्यक्षीय समारोप करताना राम अय्यर म्हणाले की, निष्ठावान कार्यकर्ते असूनही कोणतीही नाराजी न दाखवता सेवा कार्य सुरू ठेवणे ही आजच्या राजकारणात दुर्मिळ बाब असून, अ‍ॅड. ठाकूर यांच्या कार्यातून वेगळेपण जाणवते. मार्गदर्शन करताना अमर राजूरकर यांनी, उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस थंड पाणी देणे हीच खरी लोकसेवा आहे, असे सांगत अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. राजेश यादव यांनीही अन्नदान, चप्पल वाटप, छत्री वितरण, ब्लँकेट सेवा आणि ‘कायापालट’ अभियानासारख्या विविध सामाजिक उपक्रमांचा उल्लेख करत अ‍ॅड. ठाकूर यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या कार्याला देशभरातून मिळालेले 109 पुरस्कार हे त्यांच्या योगदानाची साक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी नरसिंहराव कहाळेकर, राजेश केंद्रे, प्रेमराज कोकाटे, गोपाळ रापतवार यांनीही मनोगत व्यक्त करून ड. ठाकूर यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. प्रमुख अतिथी म्हणून सुरेश शर्मा, स्वप्निल गुंडावार, रुपेश व्यास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणकुमार काबरा यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेशसिंह ठाकूर यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष भारती, गजू कापसे, अमोल गवळे, उद्धव इंगोले, सचिन उत्तरवार, जावेद पठाण, बालाजी जोंधळे, शेख रहेमान, गजानन मारावार यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS