नांदेड : नांदेड भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी अनेकांना चक्रावून टाकले आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणार्या आणि सामाजिक-धार्मिक

नांदेड : नांदेड भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी अनेकांना चक्रावून टाकले आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणार्या आणि सामाजिक-धार्मिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेल्या धर्मभूषण ड.दिलीप ठाकूर यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. काम करणार्याला वारंवार संधी नाकारायची आणि शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणे बदलायची, हा प्रकार नेमका कुणाच्या फायद्यासाठी, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेतड. ठाकूर यांचे नाव शेवटपर्यंत आघाडीवर होते. पक्षांतर्गत चर्चांमध्ये त्यांची निवड निश्चित मानली जात असताना, प्रत्यक्ष घोषणा होताच चित्र पूर्णपणे बदलले. ज्यांची नावे चर्चेतही नव्हती, अशा चेहर्यांना संधी देत पक्षाने एकप्रकारे माइंड गेम खेळल्याचे स्पष्ट झाले. यामुळे ड.ठाकूर यांच्यासह त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. अॅड.दिलीप ठाकूर हे केवळ राजकारणी नाहीत, तर सामाजिक आणि धार्मिक कार्यातही आघाडीवर असलेले व्यक्तिमत्त्व आहे. ‘भाऊचा डबा’, ‘अमरनाथ यात्रा’ यांसारखे उपक्रम राबवत त्यांनी गोरगरिबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला. गेल्या 25 वर्षांपासून ते सातत्याने राजकारणात सक्रिय आहेत. तरीही प्रत्येक वेळी निर्णायक टप्प्यावर त्यांना संधी हुकते, हा योगायोग म्हणायचा की नियोजनबद्ध दुर्लक्ष, यावर आता चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, अनेकदा अन्य कार्यकर्ते नाराज होऊन बंडखोरीचा मार्ग स्वीकारतात; मात्र अॅड.ठाकूर यांनी संयम राखत पक्षनिष्ठा कायम ठेवली. वरिष्ठ नेतृत्वावर कधीही उघड टीका न करता त्यांनी काम सुरूच ठेवले. पण याच संयमाचा गैरफायदा घेतला जातोय का, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे. अॅड.ठाकूर यांचा राजकीय प्रवासही संघर्षमय राहिला आहे. शिवसेनेतून नगरसेवक पद मिळवून त्यांनी सुरुवात केली, त्यानंतर मनसेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली आणि अखेर भाजपमध्ये स्थिरावले. मात्र, पदाच्या बाबतीत त्यांना केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले गेले, अशी टीका आता उघडपणे होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची भूमिकाही चर्चेत आली आहे. त्यांच्या हस्तक्षेपातून ड.ठाकूर यांचे राजकीय पुनर्वसन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यावेळीही तसे घडले नाही. त्यामुळे भविष्यात तरी पक्ष नेतृत्व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेणार का, की हा राजकीय वनवास आणखी लांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे केवळ ड.दिलीप ठाकूर यांच्यापुरताच प्रश्न मर्यादित राहत नाही, तर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या निर्णय प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पक्षासाठी निष्ठेने काम करणार्या कार्यकर्त्यांना वारंवार डावलले जात असेल, तर भविष्यात कार्यकर्त्यांचा उत्साह टिकणार कसा, हा मूलभूत प्रश्न आहे. निवड प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि शेवटच्या क्षणी घेतले जाणारे गुप्त निर्णय यामुळे पक्षाच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः, निवडणुकीत माघार घेणार्यांना किंवा पक्षासाठी आर्थिक व संघटनात्मक पाठबळ देणार्यांना संधी देण्याऐवजी वेगळेच निकष लावले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निष्ठा की लॉबिंग? हा प्रश्न आता कार्यकर्त्यांमध्ये ठळकपणे समोर येऊ लागला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशी नाराजी पक्षासाठी घातक ठरू शकते, हे नेतृत्वाला समजून घ्यावे लागणार आहे. अन्यथा, ड.दिलीप ठाकूर यांचा प्रश्न हा फक्त एका व्यक्तीपुरता न राहता, तो संपूर्ण कार्यकर्ता वर्गाच्या असंतोषाचा प्रतीक ठरू शकतो. एकूणच, नांदेड भाजपमध्ये सध्या सुरू असलेली ही अंतर्गत राजकारणाची खेळी कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारी ठरत आहे. काम करणार्याला न्याय कधी? हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने पुढे येत आहे.

COMMENTS