Homeताज्या बातम्यामनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन

वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. अभिनेत्रीच्य

सैनिकी विद्यालयात पदकं विजेत्या तायक्वांदो खेळाडूंचा मेडल्स, प्रमाणपत्र देऊन सन्मान
सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान
 रेल्वे रुळाच्या बाजूला असतात हे बॉक्स, तुम्हाला माहितीय का याचा उपयोग ?

मुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर येताच इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. आशा नाडकर्णी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब 1957 ला मुंबई मध्ये रहावयास आले आणि तेव्हा पासून त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्या उत्तम नर्तिका देखील होत्या. 1957 ते 1973 ह्या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपट केले. नवरंग (1959), गुरु और चेला (1973), चिराग (1969), फरिश्ता (1968), श्रीमानजी (1968), दिल और मोहब्बत (1968), अलबेला मस्ताना (1967), बेगुनाह (1970) अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

COMMENTS