Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रानडुक्कराच्या हल्ल्यात जखमी महिलेस 5 लाखांची मदत

माहूर : माहूर तालुक्यातील लसणवाडी येथे रानडुक्कराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेस वनविभागामार्फत शासन नियमानुसार 5 लाख रुपयांची आर्थिक मद

अर्धापूर ते असना राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांला लागले बुलडोझ; ररस्त्यावरील गाडे, अवैध पार्किंगला बसणार चोप
काम करणार्‍याला कायम डावलायचं? अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांचा राजकीय वनवास भाजपचा अन्याय की राजकीय गणित ?
माहूर गडावर घटस्थापनेने चैत्र नवरात्र महोत्सवाची सुरुवात

माहूर : माहूर तालुक्यातील लसणवाडी येथे रानडुक्कराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेस वनविभागामार्फत शासन नियमानुसार 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
दि. 17 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या या घटनेत लसणवाडी येथील श्रीमती मुक्ताबाई श्याम राठोड या आपल्या शेतात कापूस वेचणी करत असताना अचानक रानडुक्कराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले. घटनेची दखल घेत वनविभागाने तत्परतेने कार्यवाही करत शासन निर्णयानुसार पीडित महिलेस 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली. सदर मदतीचा धनादेश उपवनसंरक्षक मनिषा पाटील व सहाय्यक वनसंरक्षक किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी मीर साजिद अली, वनपाल मनोहर कात्तूलवार, वनरक्षक माळेकर, राकेश सोप्परवार, ओम वरकड, महेश मज्जनावर, संदीप तुपे आदी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, वन अधिकार्‍यांनी शेतकरी व नागरिकांना वन्यप्राण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे सांगितले.

COMMENTS