Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्धापूर ते असना राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांला लागले बुलडोझ; ररस्त्यावरील गाडे, अवैध पार्किंगला बसणार चोप

अर्धापूर : नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढती अपघातांची मालिका आणि वाहतुकीचा खोळंबा संपवण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. अर्धापूर

स्मार्ट मीटर बसले, पण महावितरणचा ‘स्मार्ट’ कारभार कोठे? ग्राहकांवर कर्मचार्‍यांची दमबाजी सुरूच!
रानडुक्कराच्या हल्ल्यात जखमी महिलेस 5 लाखांची मदत
माहूर गडावर घटस्थापनेने चैत्र नवरात्र महोत्सवाची सुरुवात

अर्धापूर : नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढती अपघातांची मालिका आणि वाहतुकीचा खोळंबा संपवण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. अर्धापूर ते असना नदीपर्यंतच्या मार्गावरील सर्व अतिक्रमणे, अवैध होर्डिंग्ज, पार्किंग आणि अनधिकृत दुकाने हटवण्यासाठी बुलडोझर लावून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे.यासाठी अर्धापूर पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाने विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्ते सुरक्षेबाबत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना सविस्तर निवेदन अर्धापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिले होते. या निवेदनात त्यांनी महामार्गावरील त्रुटी आणि गावांच्या सुरक्षेचा प्रश्न मांडला. यावर तात्काळ कार्यवाही करत पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी पत्रव्यवहार करून रस्ते सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेण्याची आणि तज्ज्ञ समिती नेमण्याची शिफारस केली होती. यावर बैठक पार पडली असून प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून अर्धापूर ते असना नदीपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील सर्व दुकाने आणि अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला जाणार आहे. गत महिन्यात दाभड येथील तीन जणांचा मृत्यू राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. दाभड, बामणी, शेलगाव, आणि पिंपळगाव या गावांच्या हद्दीत वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असुन या गावांच्या हद्दीत गतीरोधक बसवणे आणि वेग मर्यादेचे फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर हायवे पेट्रोलिंग आणि महामार्गावर हेल्पलाईन नंबरचे फलक कुठेही नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. आता प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी संपर्क क्रमांक लावले जातील आणि महामार्ग पोलिसांची पेट्रोलिंग गाडी तैनात केली जाईल. महामार्गावरील सीएनजी पेट्रोल पंप आणि कार शोरूमजवळ रस्त्यावर होणारी अनधिकृत पार्किंग तसेच ’राँग साईड’ने येणार्‍या वाहनांमुळे अपघात वाढत आहेत. यावर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. केवळ कारवाई न करता, या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित गावातील प्रमुख व्यक्तींची विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरेल, अर्धापूरच्या राष्ट्रीय महामार्गावर आता बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणांना थारा मिळणार नाही. जिल्हा प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
मोबदला घेऊनही ’अतिक्रमण’ कशासाठी?
रस्ता रुंदीकरणात ज्यांची जागा गेली, अशा अनेक व्यवसायिक आणि मालमत्ताधारकांना शासनाने योग्य मोबदला दिला आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर अनेकांनी  अनधिकृत बांधकाम करून दुकाने थाटली ती किरायाणे दिली आहेत. अनेक फळ विक्रेत्यांनी तर थेट मुख्य रस्त्यावरच आपली दुकाने लावल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अवैध पार्किंग, अवैध अतिक्रमणामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.

COMMENTS