नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने शांतीनगर पोलिस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 54 किलो 998 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आ
नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने शांतीनगर पोलिस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 54 किलो 998 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, रोख रकमेसह एकूण 16 लाख 51 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हे शाखेला शांतीनगरमधील दलाल चौक परिसरातील एका बंदिस्त टीनाच्या शेडमध्ये अमली पदार्थांची मोठी खेप आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार ज्ञानेश्वर भोगे आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी शेख जावेद वल्द शेख मुन्ना राहीन आणि मोहम्मद हारून रशीद पिंजारी या दोन आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली.

COMMENTS