Homeताज्या बातम्या

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांची संख्या 9 वर83 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शोधमोहीम थांबवली

पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सलग 83 तास सुरू असलेली शोध व बचाव मोहीम रविवारी पहाटे अखेर पूर्ण झाली. कचर्‍याच्या ढि

काँग्रेसचे शाश्‍वत विचारच देशाला तारणार : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
वाळू तस्करांच्या ट्रॅक्टरने महिलेला चिरडले!
डीजी परमेश शिवमणी यांनी तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा स्वीकारला पदभार
Moshi Garbage Depot Accident: 9 Rescued, 1 Dead; Search for 8 Continues


पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सलग 83 तास सुरू असलेली शोध व बचाव मोहीम रविवारी पहाटे अखेर पूर्ण झाली. कचर्‍याच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या अखेरच्या बेपत्ता कामगार वामन कसबे यांचा मृतदेह शोध पथकाला पहाटे सुमारे एकच्या सुमारास आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आला. या दुर्घटनेत मृतांचा आकडा नऊवर पोहोचला असून सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्याने प्रशासनाने शोधमोहीम अधिकृतरीत्या समाप्त झाल्याची घोषणा केली.
8 जुलै रोजी दुपारच्या सुमारास मोशी येथील कचर्‍यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचर्‍याचा प्रचंड ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत एकूण 23 कामगार अडकले होते. त्यापैकी पाच जणांनी स्वतःच्या प्रयत्नांनी बाहेर पडण्यात यश मिळविले, तर बचाव पथकाने नऊ जणांना सुरक्षित बाहेर काढले. सुरुवातीला एका कामगाराचा मृतदेह सापडल्यानंतर उर्वरित बेपत्ता कामगारांचा शोध युद्धपातळीवर सुरू होता. शोधमोहीमेदरम्यान दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काही भाग नियंत्रित पद्धतीने पाडण्यात आला, जेणेकरून अडकलेल्या भागापर्यंत पोहोचणे शक्य होईल. त्यानंतर शनिवारी सात मृतदेह बाहेर काढण्यात आले. अखेर रविवारी पहाटे वामन कसबे यांचा मृतदेह सापडल्याने चार दिवसांपासून सुरू असलेल्या शोधकार्याची सांगता झाली. या बचाव मोहिमेत अनेक गंभीर अडथळ्यांचा सामना करावा लागला. सतत घसरत असलेला कचर्‍याचा ढिगारा, दुर्गंधीयुक्त आणि विषारी वायू, ढासळलेले सिमेंटचे मोठे तुळई आणि खांब, तसेच अस्थिर जमीन यामुळे बचाव कार्य अत्यंत धोकादायक बनले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही विविध यंत्रणांनी समन्वय राखत अविरत प्रयत्न सुरू ठेवले. या मोहिमेत भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अग्निशमन पथक, पोलीस तसेच इतर शासकीय यंत्रणांनी संयुक्तरीत्या सहभाग घेतला. आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने आणि अत्यंत सावधगिरी बाळगत ढिगारा हटविण्याचे काम करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, प्रशासकीय इमारतीतील संपूर्ण परिसराची तपासणी पूर्ण झाली असून सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध लागल्यामुळे बचाव मोहीम थांबविण्यात आली आहे. कचर्‍याच्या प्रचंड दबावाखाली मोठे सिमेंटचे तुळई आणि खांब कोसळल्याने अडकलेल्या कामगारांना जिवंत बाहेर काढणे शक्य झाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
जबाबदारी निश्‍चित करणार
या दुर्घटनेमुळे कचरा व्यवस्थापन, औद्योगिक सुरक्षाव्यवस्था आणि अशा प्रकल्पांमधील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत अनेक गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू असून जबाबदारी निश्‍चित करून आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हळहळ व्यक्त करत आहे.

COMMENTS