जामखेड : सध्या बेरोजगारांचा प्रश्न मोठा आहे. अशावेळी “शासन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा च्या माध्यमातून रोजगाराच्या संधी युवकांच्या दाराप

जामखेड : सध्या बेरोजगारांचा प्रश्न मोठा आहे. अशावेळी “शासन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा च्या माध्यमातून रोजगाराच्या संधी युवकांच्या दारापर्यंत घेऊन आले आहे. युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत स्वतःच्या प्रगतीसह समाजाच्या विकासातही सक्रिय योगदान द्यावे असे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रतिनिधी अमितभाऊ चिंतामणी यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने जामखेड महाविद्यालयाच्या पुढाकारातूनजामखेड महाविद्यालयात आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी तब्बल ७६ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड नोकरीसाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या प्लेसमेंट व्यवस्थेचा चांगला ठसा उमटला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख होते. प्रमुख मार्गदर्शक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर येथील प्र. सहाय्यक आयुक्त योगेश उगले उपस्थित होते. तसेच अमोल घोलप, प्राचार्य डॉ. जी. डी. केळकर, प्रा. एस. एन. गाडेकर, डॉ. एस. एम. गोलेकर, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळाव्यात विद्यार्थ्यांना रोजगार, करिअर आणि उद्योजकतेच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपलब्ध नोकरीच्या संधी, आवश्यक पात्रता आणि निवड प्रक्रियेची माहिती दिली.विद्यार्थ्यांनीही तज्ज्ञांशी संवाद साधत शंकांचे निरसन करून घेतले. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यंदा ७६ विद्यार्थ्यांची झालेली निवड ही महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रभावी प्लेसमेंट व्यवस्थेची साक्ष देणारी ठरली आहे.

COMMENTS