Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’बाबुराव पासष्टी’ निमित्त्त डॉ. जगताप यांनी दिलेली गुरुदक्षिणा मौलिक ः डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर ः गुरु आणि शिष्याचे नाते ज्ञानयुक्त आणि माणुसकीसूक्त धाग्याने एकरूप हवे.यादृष्टीने साहित्यिक डॉ. रामकृष्ण जगताप यांनी ’बाबुराव पासष्टी

दिव्यत्वाची प्रचिती, हीच माणुसकीची संस्कृती ः डॉ. बाबुराव उपाध्ये
कृष्णानंद महाराजांचा बाल अनाथाश्रम मानवसेवेचे तीर्थक्षेत्र ः डॉ. बाबुराव उपाध्ये
डॉ. बाबुराव उपाध्ये यांना साहित्यभूषण पुरस्काराबद्दल गौरव  

श्रीरामपूर ः गुरु आणि शिष्याचे नाते ज्ञानयुक्त आणि माणुसकीसूक्त धाग्याने एकरूप हवे.यादृष्टीने साहित्यिक डॉ. रामकृष्ण जगताप यांनी ’बाबुराव पासष्टी ’हा गौरवग्रन्थ संपादित करून मौलिक गुरुदक्षिणा दिली असल्याचे मत साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
   श्रीरामपूर येथील बोरावकेनगरमधील राज माइंड पावर पब्लिकेशन लिमिटेडतर्फे डॉ. रामकृष्ण जगताप संपादित ’बाबुराव पासष्टी ’या गौरवग्रन्थावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. संयोजक डॉ. रामकृष्ण जगताप यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पुस्तकाचा परिचय करून दिला.यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक सुखदेव विठ्ठल शिंदे, दहिगावनेचे प्रहारचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा अंबादास सातपुते, शन्कर रामचंद्र थोरात, सुदाम तुकाराम थोरात, सुभाष गेणू वाकचौरे, बाळासाहेब दत्तू काकडे, रितेश सुदाम थोरात,श्रीमती विमलमाई अंबादादा सातपुते,सौ. अनिता सुखदेव शिंदे, सौ. चंद्रकला शन्कर थोरात, सौ. सुनीता वाकचौरे, डॉ. सौ. पल्लवी मनोज थोरात, सौ. उषा सुदाम थोरात, कु. श्‍वेता सुदाम थोरात आदिंनी पुस्तक परिसंवादात भाग घेतला.सौ. उज्जवलाताई रामकृष्ण जगताप, सूरज रामकृष्ण जगताप, डॉ. भक्ती रामकृष्ण जगताप यांनी परिसंवादाचे नियोजन केले. सूरज जगताप यांनी अनेक पुस्तकांना काढलेल्या मुखपृष्ठाबद्दल त्यांचा सुखदेव शिंदे यांनी सत्कार केला. रामकृष्ण जगताप यांनी लिहिलेले ’पोरका बाबू ’, ’साहित्यशिल्प ’, ’लेखणीचे झाड’, ’बाबुराव पासष्टी ’इत्यादी पुस्तके लिहिल्याबद्दल त्यांचा कृष्णा सातपुते यांनी सत्कार केला.अनेकांनी ’पोरका बाबू’ची तिसरी आवृत्ती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. उपाध्ये यांनी सर्वांच्या आत्मीय पुस्तकप्रेमाबद्दल, वाचन संस्कृती वाढविल्याबद्दल कौतुक केले.डॉ. भक्ती जगताप यांनी आभार मानले.

COMMENTS