Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी पॉलिटेक्निकच्या १७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत नोकरी; कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यश

कोपरगाव : संजीवनी के. बी. पी. तंत्रनिकेतनच्या (पॉलिटेक्निक) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) विभागातील १७ विद्यार्थ्यांची नामांकित उद्

वादळाने झालेल्या नुकसानीची आमदार आशुतोष काळेंकडून पाहणी; प्रशासनाला तातडीने पंचनाम्यांचे आदेश
दक्षिण काशी पुणतांबाच्या विकासाला गती देणार; तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार – सभापती प्रा. राम शिंदे
प्राण्यांच्या उत्क्रांती विषयावर ‘के.जे. सोमैया’त व्याख्यान

कोपरगाव : संजीवनी के. बी. पी. तंत्रनिकेतनच्या (पॉलिटेक्निक) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) विभागातील १७ विद्यार्थ्यांची नामांकित उद्योगसंस्थेत नोकरीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना चांगले वेतन आणि गुणवत्तापूर्ण रोजगार मिळाल्याने संस्थेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘काळोखे आरएमसी’ (Kalokhe RMC) या नामांकित उद्योगसंस्थेने विद्यार्थ्यांना नोकरीची ही संधी दिली असून, संस्थेच्या प्रशिक्षण व नोकरी मार्गदर्शन (प्लेसमेंट) विभागाचे यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान राहिले. उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी संस्थेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रवींद्र हेम्बाडे, मनोज हुळुळे, अक्षय मडके, दर्शन शिंदे, साईरात शिंदे, शिवम कोकरे, प्रणव कवडे, समर्थ सोनवणे, प्रथमेश थोरात, ओम मढे, विशाल शिंदे, आयुष यादव, सौरभ बनकर, श्रावणी सोनजे, नम्रता रणशूर, सचिन घाडगे आणि वेदांत बनसोडे यांचा समावेश आहे.

याबाबत माहिती देताना प्राचार्य ए. आर. मिरीकर म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळेच ‘संजीवनी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश म्हणजे हमखास नोकरी’ हे समीकरण आता दृढ झाले आहे.”

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संजीवनी समूहाचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. तर व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. आर. एस. शेंडगे व प्लेसमेंट विभागाचे सदस्य उपस्थित होते.

COMMENTS