Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; आयपीएल सट्टेबाजीचं जाळं उद्ध्वस्त, ७ बुकी गजाआड!

https://www.youtube.com/watch?v=zeNDrOZzMKs नागपूर शहरात क्रिकेट सट्टेबाजीविरोधात पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. काल रात्री

नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली;राणा-वडेट्टीवार वाद चिघळला; आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फैर
अक्षय तृतीयेच्या दिवशी होणारे; बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
अमरावती हादरले! १८० तरुणींचे शोषण करून अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या

नागपूर शहरात क्रिकेट सट्टेबाजीविरोधात पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. काल रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या सात बुकींना पोलिसांनी अटक केली.
गुप्त माहितीच्या आधारे क्राईम ब्रँचने सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छावणी परिसरात छापा टाकला. यावेळी सट्टेबाज लॅपटॉप आणि वाय-फायच्या मदतीने ग्राहकांशी संपर्क साधून लाखो रुपयांची उलाढाल करत होते. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा तपास आता वेगाने सुरू आहे.

COMMENTS