Homeताज्या बातम्या

पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात

पाथर्डी  : नियमित योगासने केल्याने आरोग्यवार होणारे दुष्परिणाम दूर ठेवण्यास मदत होत असून माणसाचा जीवनशैलीचा पाया मजबूत होतो; त्यामुळे प्रत्येकाने

पाणंद रस्ते ग्रामीण मार्गात समाविष्ट करण्यासाठी श्रीगोंदेत धरणे
ऐतिहासिक रस्ता, चौक, वास्तूस भूषण देशमुखांचे नाव द्यावे : गुगळे  
बाणेश्वर विद्यालयातील गुणवंतांचा आ. कर्डिलेंकडून सन्मान
अंतर्राष्ट्रीय योग दिवस - People's University


पाथर्डी  : नियमित योगासने केल्याने आरोग्यवार होणारे दुष्परिणाम दूर ठेवण्यास मदत होत असून माणसाचा जीवनशैलीचा पाया मजबूत होतो; त्यामुळे प्रत्येकाने योगाला महत्व देत दिनचर्येचा अविभाज्य भाग बनवावे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. त्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार मोनिका राजळे  मार्गदर्शन करताना योगाचे महत्त्व बोलत होत्या; दरम्यान योग दिनानिमित्त पाथर्डी तालुक्यात विविध शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला.
 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रोहित आदलिंग यांनी योगासने व प्राणायामाचे मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके सादर केली.  
बाबुजी आव्हाड महाविद्यालयातही योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमास नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष मंगलताई कोकाटे, सिंधूताई साठे, सचिन वायकर, कुणाल आव्हाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर येथे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. सामूहिक योगाभ्यासानंतर प्रविणा गोल्हार यांनी विद्यार्थ्यांना योगाचे आरोग्यदायी फायदे व आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रमुख पाहुणे शिवाजी कराड यांनी विद्यार्थ्यांना दररोज योग करण्याचे आवाहन केले.
येळी येथील महात्मा गांधी विद्यालयातही जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. प्राचार्य विलास वाळुंजकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले.
पाथर्डी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा करण्यात आला. पोलिसांच्या धकाधकीच्या जीवनात वाढणारा ताण आणि शारीरिक समस्या लक्षात घेता योग व प्राणायामाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

COMMENTS