सोनई : मुळा कारखान्याच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाच्या निवडी मंगळवारी (दि. 7 जुलै) जाहीर करण्यात आल्या. प्राधिकृत अ

सोनई : मुळा कारखान्याच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाच्या निवडी मंगळवारी (दि. 7 जुलै) जाहीर करण्यात आल्या. प्राधिकृत अधिकारी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केलेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी चेअरमनपदी भाऊसाहेब निवृत्ती मोटे तर व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब दादा पाटील यांच्या निवडी जाहीर केल्या. माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी संचालक मंडळाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करुन त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी मुळाचे मा चेअरमन नानासाहेब तुवर ,मा व्हा चेअरमन कडूबाळ कर्डीले,नवनिर्वाचित चेअरमन भाऊसाहेब मोटे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलतांना मा मंत्री शंकरराव गडाख म्हणाले कारखाना सभासदांनी मोठा विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे. नूतन संचालक मंडळाने सभासद ,शेतकरी यांना केंद्रस्थानी मानून काम करावे. कारखाना ही परिसरासह तालुक्याची कामधेनु आहे. सभासदांनी मुळा कारखान्याला ऊस द्यावा असे आवाहन त्यांनी केले. व सदैव सभासद ,शेतकरी यांच्याशी कटिबद्ध राहून काम करू असे मा मंत्री शंकरराव गडाख म्हणाले. स्वतः लक्ष घालून कारखाना गळीत हंगामाचे नियोजन करणार असल्याचे सांगितले व नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. आयोजीत केलेल्या संचालक मंडळाच्या मिटींगचे औचित्य साधून कारखान्याने मिल रोलरचे पुजन करण्याचा कार्यक्रम माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत आयोजीत केला होता. याप्रसंगी ज्ञानेश्वर देवस्थानचे देविदास महाराज म्हस्के,जेष्ठ नेते विश्वासराव गडाख,दादासाहेब शेळके, कारभारी जावळे आदीसह विविध संस्थाचे पदाधिकारी,सभासद, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS