Homeताज्या बातम्या

वीज रोहित्रावर वेलींचे साम्राज्यसाकुरीतील धोकादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप

राहाता : साकुरी परिसरातील महावितरणच्या एका वीज रोहित्रावर मोठ्या प्रमाणात वेली आणि झुडपे वाढल्याने गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित रोहित्र पूर्णपणे वेलींच्या विळख्यात अडकले असून, याकडे महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक दिवसांपासून वीज रोहित्राभोवती वेली वाढत आहेत. पावसाळ्यात या वेली अधिक दाट झाल्याने रोहित्रापर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीत शॉर्टसर्किट, ठिणग्या उडणे, आग लागणे किंवा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.महावितरणकडून वीज यंत्रणांची नियमित देखभाल, परिसराची स्वच्छता आणि धोकादायक झाडे-वेली हटविण्याची जबाबदारी असतानाही साकुरी येथील या रोहित्राकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, एखादी दुर्घटना घडल्यानंतर हालचाली करण्यापेक्षा आताच वीज रोहित्रावरील वेली तातडीने हटवून परिसर सुरक्षित करावा. तसेच गावातील सर्व वीज रोहित्रांची तपासणी करून आवश्यक देखभाल करण्यात यावी.साकुरीतील या प्रकारामुळे महावितरणच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी, विजेचा काही खोळंबा झाला तर नागरिकांचे देखील हाल होणार आहेत. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कंपनीने तातडीने या डीपीवरील वेळी काढाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.महावितरण कंपनीच्या डीपीला वेलीने पूर्ण वेडा दिला असून या डीपीवर वायरमनला सुद्धा काम करणे मुश्किल होणार आहे. तसेच जर एखादी घटना घडली किंवा डीपीचा फ्युज गेला तर वायरमनला फ्युज टाकणे देखील मुश्किल या ठिकाणी होणार आहे. विजेचा काही खोळंबा झाला तर नागरिकांचे देखील हाल होणार आहेत. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कंपनीने तातडीने या डीपीवरील वेळी काढाव्यात.- दीपक कसबे, सामाजिक कार्यकर्ते.

श्रीकृष्ण जीवनचरित्र सृष्टांची बाजू सांगणारे चिरंजीवचरित्र
गलिच्छ राजकारण करणाऱ्यांबरोबर तडजोड नाही : परजणे
वैष्णोदेवीनंतर शाहरुख खान साईबाबांच्या नगरीत दाखल

COMMENTS