कोपरगाव शहर : राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असतांना सरकार मात्र केवळ घोषणांचा पाऊस पाडत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ब

कोपरगाव शहर : राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असतांना सरकार मात्र केवळ घोषणांचा पाऊस पाडत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट वीना अट कर्जमाफी करावी या मागणी साठी डफ-हलकडी वाजवत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत शासन प्रशासनाचे लक्ष वेधले.
या प्रसंगी कोपरगाव तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, उपजिल्हाप्रमुख असलम शेख, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, शहरप्रमुख गगन हाडा, विधानसभा सहसंघटक मुन्ना मन्सुरी, विधानसभा संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे, माजी तालुकाप्रमुख संजय दंडवते, मनोज कपोते, विवेक कुलकर्णी बाळासाहेब वाडेकर, युवा सेना तालुकाप्रमुख विजय गोर्डे, बाळासाहेब वाकळे, आबासाहेब पवार, सुनील माकोणे, मच्छिंद्र देवकर, नवनाथ देवकर, कुणाल मेहेरखांब, बाळासाहेब मापारी, अशोक मुरडणर, कान्हा हाडा, निखिल कंक्राळे, ऋषी खैरनार, वैभव शेलार, विनय टाक, राहुल हाडा, याकुब शेख, निलेश मरसाळे, पियुष सैंदाणे, स्वप्निल निरभवणे, अनिल वालझडे, प्रदीप मोरे आदींसह शिवसैनिक, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.
ठाकरे सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कोणतीही अट न लावता सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पिक विमा व नुकसान भरपाई तत्काळ वितरित करावी तसेच शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत ठोस धोरण राबवावे आदी मागण्या करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार केवळ आश्वासनाची खैरात वाटत आहे ही भूमिका तातडीने बदलली नाही तर शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.

COMMENTS