कंपनीतील सहकारी महिलेवर शारीरिक अत्याचार ; नगरमधील घटना, पेयात गुंगीचे औषध टाकले

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कंपनीतील सहकारी महिलेवर शारीरिक अत्याचार ; नगरमधील घटना, पेयात गुंगीचे औषध टाकले

अहमदनगर/प्रतिनिधी : कंपनीतील सहकारी महिलेस घरी बोलावून तिच्या पेयात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार करून व त्याचे व्हिडिओ बनवून धमकी देऊन तिच्याव

फडणवीसांची ती ऑफर…रस्त्यातील नमस्कारासारखी…
महिलेवर अत्याचार.. माजी पोलिस निरीक्षकांच्या मुसक्या आवळल्या l पहा LokNews24
Ahmednagar : नगरमधील आस्थापना कर्मचाऱ्यांची कोरोना आरटीपीसआर चाचणी l Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी : कंपनीतील सहकारी महिलेस घरी बोलावून तिच्या पेयात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार करून व त्याचे व्हिडिओ बनवून धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना नगरमध्ये घडली. याबाबतची माहिती अशी की, एमआयडीसीतील श्री गणेश पेस्ट कंट्रोल पॅनल या कंपनीत योगेश कांडेकर हा ऑपरेटर म्हणून काम करीत होता. या ठिकाणी एक परप्रांतीय विवाहित महिला (वय 27 वर्षे) जून 2020पासून ऑपरेटर म्हणून काम करीत होती. सहकारी म्हणून या महिलेशी योगेश कांडेकरचे नेहमी बोलणे होत असे. त्यातून जवळीक साधून त्याने तिला पत्नीने घरी बोलावल्याचे कारण सांगून 3 जानेवारी रोजी त्याने या महिलेला घरी नेले व तिला पेयातून गुंगीचे औषध पाजून अत्याचार केला तसेच त्याचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले. महिलेने विचारले असता, मला तू खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणाला. महिलेने नकार देताच, तू संबंध ठेवले नाही तर तुझा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करेल, असे धमकावले. त्यानंतर सातत्याने घरी बोलावून व विविध ठिकाणी लॉजवर अत्याचार केला. या प्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी योगेश दिनकर कांडेकर (रा. राघवेंद्र स्वामी मंदिराजवळ, बोल्हेगाव, ता. नगर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उड़ाली असून नगरच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. पोलिसांनी यादृष्टीने तपास करून महिलांना संरक्षण देण्याची मागणी होत आहे.

COMMENTS