Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रामाणिकपणा व इमानदारी हीच आदिवासी समाजाची कवच कुंडले ः पो.नि.देसले

कोपरगाव प्रतिनिधी ःआदिवासी समाजाचा प्रामाणिकपणा व इमानदारी हीच कवच कुंडले असून, त्यामुळे हा समाज आजही समाजात सन्मानाने व विश्‍वासाने जीवन जगत अस

प्रामाणिकपणा व इमानदारी हीच आदिवासी समाजाची कवच कुंडले ः पो.नि.देसले
प्रामाणिकपणा व इमानदारी हीच आदिवासी समाजाची कवच कुंडले ः पो.नि.देसले
प्रामाणिकपणा व इमानदारी हीच आदिवासी समाजाची कवच कुंडले ः पो.नि.देसले

कोपरगाव प्रतिनिधी ःआदिवासी समाजाचा प्रामाणिकपणा व इमानदारी हीच कवच कुंडले असून, त्यामुळे हा समाज आजही समाजात सन्मानाने व विश्‍वासाने जीवन जगत असल्याचे वक्तव्य कोपरगाव तालुका पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी जागतिक आदिवासी दिन आयोजित कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
कोपरगाव तालुक्यातील सर्व आदिवासी कर्मचार्‍यांनी एकत्र येत जागतिक आदिवासी दिन मोठया जल्लोषात साजरा केला. याप्रसंगी आदिवासी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक महारु चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक पो.नि. शेवंगावचे किशोर पावरा, नायब तहसीलदार कोपरगाव राजेंद्र चौरे, सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी देविदास गायकवाड, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळू बांडे, डॉ.गणेश ठोंबरे, आदिवासी महादेव कोळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे, ज्ञानेश्‍वर वाकचौरे आदी मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.

COMMENTS