कर्जत : प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि संघर्षाच्या वाटेवर चालतही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, याचे प्रे

कर्जत : प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि संघर्षाच्या वाटेवर चालतही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण हेमंत नेवसे यांनी घालून दिले आहे. अत्यंत सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीतून चार्टर्ड अकाउंटंट ही प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या हेमंत नेवसे यांचा संत सावता महाराज मंदिर परिसर विकास समितीच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला.
शेतकरी कुटुंबातील हेमंत नेवसे यांचे वडील शरद नेवसे हे शेतकरी असून आई गृहिणी आहे. साधी परिस्थिती, मर्यादित साधनसामग्री आणि मोठी स्वप्ने घेऊन सुरू झालेला हा प्रवास आज यशाच्या उंच शिखरावर पोहोचला आहे. त्यामुळे हेमंतचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
यावेळी बोलताना रामदास हजारे म्हणाले, “हेमंतने अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेत आपल्या जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. कोणतीही मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानाही मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या या यशामध्ये आई-वडील आणि बहिणींचा मोठा वाटा आहे.”
यावेळी शिवाजी आप्पा राऊत, जयवंत गदादे, रवींद्र राऊत, रावसाहेब खराडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक नेवसे यांनी केले तर आभार प्रा. विशाल मेहेत्रे यांनी मानले.
कार्यक्रमास कर्जतचे माजी सरपंच शिवाजीराव राऊत, रावसाहेब खराडे, काकासाहेब ढेरे, दत्तात्रय नेवसे, शरद मेहेत्रे, संतोष गोरे, उपमन्यू शिंदे, जालिंदर जमदाडे, सचिन नेवसे तसेच समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS