Homeताज्या बातम्या

मुंढेकरवाडीचा यश कुरुमकर देशसेवेत; भारतीय सैन्य दलाचे कठीण प्रशिक्षण पूर्ण करून राजस्थानमध्ये होणार रुजू

श्रीगोंदा: तालुक्यातील लिंपणगाव कार्यक्षेत्रातील मुंढेकरवाडी येथील भूमीपुत्र यश संभाजी कुरुमकर यांनी भारतीय सैन्य दलाचे कठीण प्रशिक्षण यशस्वीरित्

आसाममध्ये ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के; कचार जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सौर ऊर्जा, जलसंधारणातील कामांची दखल; तिगावच्या सरपंच अर्चना राज पाटील यांना लोकमत सरपंच अवॉर्ड 2026
दंत आरोग्य व दंत पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राची जागतिक केंद्र बनण्याची क्षमता: डॉ. राजेश गवांदे

श्रीगोंदा: तालुक्यातील लिंपणगाव कार्यक्षेत्रातील मुंढेकरवाडी येथील भूमीपुत्र यश संभाजी कुरुमकर यांनी भारतीय सैन्य दलाचे कठीण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून देशसेवेसाठी सज्ज होत गावासह संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढविला आहे. यश हे प्रगतिशील व अभ्यासू शेतकरी ऍड. प्रदीप संभाजी कुरुमकर यांचे धाकटे बंधू तथा संभाजी हौसराव कुरुमकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी पुणे येथील बॉम्बे सेपर्स प्रशिक्षण केंद्रात भारतीय सैन्याचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले असून, आता राजस्थान रेजिमेंट (२६७) मध्ये बिकानेर येथे देशसेवेसाठी रुजू होणार आहेत.

यश यांनी श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून बारावी (क्रॉप सायन्स) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या श्री छत्रपती अकॅडमीमध्ये सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेतले. याच काळात त्यांनी बी.ए. पदवी तसेच एनसीसीचे (NCC) शिक्षणही पूर्ण केले. त्यांच्या या यशामागे प्रा. वैभव सोनवणे, प्रा. डॉ. सतीश चोरमले, प्रा. एन. टी. पवार आणि प्रा. डॉ. महेश गिरमकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या या यशाबद्दल सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, व्हाईस चेअरमन संदीप औटी, प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, प्रा. सुनील माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. मुंढेकरवाडी आणि परिसरातील नागरिकांकडूनही यश कुरुमकर यांच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे.

COMMENTS