एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या (Video)

Homeमहाराष्ट्र

एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या (Video)

दोन दिवसांमध्ये 2 तरुण शेतकऱ्यांसह एका वृद्ध शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील केज, वडवणी, परळी या तालुक्यात प्रत्येकी एक

राजारामबापू कारखान्याच्या कर्मचार्‍यांना 12 टक्के पगारवाढ : पी आर पाटील
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकआजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कारकर्जमाफी, महागाई, दुष्काळी प्रश्‍नांवरून विरोधक घेरणार
शेतकऱ्यांचा एल्गार! शेत रस्ता आणि ओढ्याचे अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे आमरण उपोषण!

दोन दिवसांमध्ये 2 तरुण शेतकऱ्यांसह एका वृद्ध शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील केज, वडवणी, परळी या तालुक्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

बाळासाहेब रामलिंग गित्ते याने 19 तारखेला आत्महत्या केली. तर सिद्धेश्वर धर्मराज फरताडे याने काल 20 तारखेला सकाळी व नागोराव धोंडिबा शिंदे यांनी काल सायंकाळी उशिरा आत्महत्या केली.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झाल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीने मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालं आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरी शासनाची मदत पोहोचली नाही.

COMMENTS