Homeताज्या बातम्या

व्यावसायिक गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त; १ ऑगस्टपासून नवे दर लागू, घरगुती गॅसचे दर मात्र जैसे थे

नवी दिल्ली: ऑगस्ट महिनयाच्या पहिल्याच दिवशी हॉटेल, उपहारगृहे, भोजनालय, ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी मोठा दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात

नीट गैरव्यवहार प्रकरण भोवले! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; लोकशाहीपुढे सत्तेलाही झुकावे लागले: अभिजित दीपके
बँक ऑफ बडोदाचा १ TB डेटा डार्क वेबवर लीक झाल्याचा आरोप; ग्राहकांची महत्त्वाची माहिती धोक्यात? बँकेचा खुलासा
संस्कारच्या चिमुकल्यांनी केला विठ्ठल नामाचा जयघोष; संस्कार विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी
मोठा दिलासा...! LPG गॅस सिलिंडर 41 रुपयांनी स्वस्त झाला; जाणून घ्या,  तुमच्या महानगरातील नवे दर | Big relief commercial LPG gas cylinder becomes  cheaper by Rs 41; Know the new rates in

नवी दिल्ली: ऑगस्ट महिनयाच्या पहिल्याच दिवशी हॉटेल, उपहारगृहे, भोजनालय, ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी मोठा दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक स्वयंपाक गॅस सिलेंडरच्या दरात दोनशे रुपयांहून अधिक कपात केली असून, नवे सुधारित दर १ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात झालेल्या या दरकपातीमुळे व्यावसायिकांचा इंधन खर्च कमी होणार असून, त्याचा सकारात्मक परिणाम अन्नव्यवसाय क्षेत्रावर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात २०२ रुपयांची, तर कोलकात्यात २०९ रुपयांची कपात करण्यात आली आहे. या दरकपातीनंतर दिल्लीमध्ये या सिलेंडरची किंमत २,७२८ रुपये, तर कोलकात्यात २,८७२ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. देशातील इतर महानगरांमध्येही यानुसार सुधारित दर लागू करण्यात आले आहेत.

व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला असला तरी १४.२ किलो वजनाच्या घरगुती स्वयंपाक गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना या वेळी दिलासा मिळालेला नाही. सुधारित दरानुसार दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर ९४२ रुपये, मुंबईत ९४१ रुपये ५० पैसे, कोलकात्यात ९६८ रुपये, तर चेन्नईमध्ये ९५७ रुपये ५० पैसे या दराने उपलब्ध राहणार आहे. स्थानिक कर आणि मूल्यवर्धित करांमुळे (VAT) राज्यनिहाय दरांमध्ये किरकोळ फरक असू शकतो.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे. यापूर्वी १ जुलै रोजीही १८३ रुपये ५० पैशांपर्यंत दर कमी करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे.

मात्र, याआधी वर्षाच्या सुरुवातीपासून जूनअखेरपर्यंत परिस्थिती वेगळी होती. जानेवारी ते जून या कालावधीत तब्बल सात वेळा दरवाढ करण्यात आली होती. विशेष म्हणजे मार्च महिन्यात दोन वेळा दर वाढवण्यात आले होते. त्या काळात पश्चिम आशियातील तणाव, आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरातील चढ-उतार आणि पुरवठा साखळीवरील परिणामांमुळे दरांवर मोठा दबाव निर्माण झाला होता.

१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल, उपहारगृहे, केटरिंग व्यावसायिक, ढाबे, मिठाई उत्पादक, सामूहिक स्वयंपाकगृहे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये केला जातो. त्यामुळे या दरकपातीमुळे या क्षेत्रातील इंधन खर्चात मोठी बचत होणार आहे.

COMMENTS