Homeताज्या बातम्या

दुखापतीमुळे यानिक सिन्नरची सिंसिनाटी स्पर्धेतून माघार

वॉशिंग्टन : विम्बलडनसह पाच ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवणारा इटलीचा स्टार टेनिसपटू यानिक सिन्नर याने उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे सिंसिनाटी टेनिस स

नीट आंदोलनामुळे मुंबईत कठोर निर्बंध; ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी, परवानगीशिवाय मोर्चा किंवा आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा
नांदेड शहरातील डी-मार्ट रोडवरील झाडांची विनापरवाना कत्तल? जाहिरात फलकांसाठी हरित संपदेवर घाला; कारवाईची मागणी
पुराच्या रौद्ररूपात कवटाळला एक तरुण जीव: कंचलीत सेवकाचा दुर्दैवी अंत; २४ तासांनंतरही शोधाची धडपड सुरू
शांघाय मास्टर्समध्ये ग्रीक्सपूरला विजय मिळवून देण्यासाठी जननिक सिनर  क्रॅम्पसह निवृत्त झाला | टेनिस | द गार्डियन

वॉशिंग्टन : विम्बलडनसह पाच ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवणारा इटलीचा स्टार टेनिसपटू यानिक सिन्नर याने उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे सिंसिनाटी टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी समाजमाध्यमांवरील अधिकृत खात्यावरून ही माहिती दिली. सिन्नर हा गेल्या वर्षाच्या स्पर्धेचा विजेता असल्याने त्याच्या माघारीमुळे यंदाच्या स्पर्धेला मोठा धक्का बसला आहे.

सिन्नरने २०२४ मध्ये अंतिम सामन्यात अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोचा टायब्रेकरमध्ये ७-६ (७-४), ६-२ असा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. मात्र, दुखापतीमुळे यंदा त्याला आपल्या विजेतेपदाचा बचाव करता येणार नाही. आयोजकांनी सिन्नरच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना पुढील वर्षी त्याचे पुन्हा स्वागत करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सिन्नरच्या माघारीसोबतच स्पेनचा आघाडीचा टेनिसपटू कार्लोस अल्काराझ याचेही सिंसिनाटी स्पर्धेतील पुनरागमन लांबले आहे. त्यामुळे जागतिक टेनिसमधील या दोन युवा आणि आघाडीच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत स्पर्धा रंगणार आहे. अल्काराझला एप्रिलमध्ये बार्सिलोना स्पर्धेदरम्यान मनगटाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो स्पर्धात्मक टेनिसपासून दूर आहे. या दुखापतीमुळे त्याला फ्रेंच खुली स्पर्धा आणि विम्बलडन स्पर्धेलाही मुकावे लागले. सिंसिनाटी स्पर्धेत सहभागी न झाल्याने गेल्या वर्षीचे विजेतेपद राखण्याची त्याची संधीही संपली आहे. अल्काराझने आता या मोसमातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत पुनरागमन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत तो गतविजेता म्हणून सहभागी होणार आहे. गेल्या काही आठवड्यांत अल्काराझच्या दुखापतीतून सावरण्याची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. सुरुवातीला त्याने शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक सराव केला. त्यानंतर त्याने टेनिसच्या सरावालाही सुरुवात केली आहे. मात्र, सिंसिनाटी स्पर्धेत त्याचे पुनरागमन होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंसिनाटी टेनिस स्पर्धा १३ ते २३ ऑगस्टदरम्यान होणार आहे. त्यानंतर ३० ऑगस्टपासून अमेरिकन खुली स्पर्धा सुरू होईल. त्यामुळे सिन्नर आणि अल्काराझ या दोन्ही युवा खेळाडूंच्या दुखापतींकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे.

COMMENTS