Homeताज्या बातम्या

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खडकेवाके येथे शालेय साहित्य वाटप; भीमशक्ती सामाजिक संघटनेचा उपक्रम

राहाता : राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खडकेवाके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळ

ओमकारचा अपघाती मृत्यू की घातपात?न्याय मिळवून देण्यासाठी आजोबांची आर्त हाकमृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणत आंदोलन
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहात्यात ‘मॅरेथॉन २०२६’ चा थरार; शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राहात्यात आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा सत्कार

राहाता : राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खडकेवाके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (पोकळे वस्ती) येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पुष्पगुच्छ, शाल आणि हार यांवर अनावश्यक खर्च न करता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याच्या विखे पाटील यांच्या सूचनेनुसार हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला.

भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या पुढाकारातून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिली यांसह विविध शालेय साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना अनिल गायकवाड म्हणाले की, “राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे विकासाभिमुख नेतृत्व असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे, हीच या उपक्रमामागील मुख्य भावना आहे.” या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी स्वागत केले. या प्रसंगी संदीप लावरे, शरद मुरादे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कैलास मुरादे, संदेश गायकवाड, राजेंद्र मुरादे, ऋषी गायकवाड, मुख्याध्यापक संदीप वाघमारे, दिनेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS