Homeताज्या बातम्या

नांदेड शहरातील डी-मार्ट रोडवरील झाडांची विनापरवाना कत्तल? जाहिरात फलकांसाठी हरित संपदेवर घाला; कारवाईची मागणी

नांदेड: शहरातील कॅनॉल रोडवरील डी-मार्टसमोरील परिसरात जाहिरातीचे फलक स्पष्ट दिसावेत यासाठी विनापरवाना झाडांची कत्तल करण्यात आल्याचा गंभीर आरोप पुढ

प्रेयसीचा उशीने तोंड दाबून खून; प्रियकराला ठाणे शहरातून काही तासांतच अटक
लोहगड हत्याप्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यात; सिया आणि चेतनला लोहगडावर नेऊन केतनच्या खूनाचा सीन केला रिक्रिएट
माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेत शेतकर्‍यांना मार्गदर्शन; सोयाबीन पिकासाठी विषमुक्त शेतीचा संदेश
डी-मार्ट परिसरातील रस्त्याच्या मधोमध लावलेली झाडे तोडली जात असल्याचे  नागरिकांकडून सांगितले जात आहे. शहराचा हरित वारसा जपण्यासाठी अशा प्रकारांवर  तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे., जर ही झाडे अधिकृत ...

नांदेड: शहरातील कॅनॉल रोडवरील डी-मार्टसमोरील परिसरात जाहिरातीचे फलक स्पष्ट दिसावेत यासाठी विनापरवाना झाडांची कत्तल करण्यात आल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. काही दुकानदारांनी मजुरांकडून झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी थेट झाडे तोडल्याची चर्चा परिसरात असून, या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यालगत असलेल्या झाडांमुळे काही व्यावसायिक आस्थापनांचे जाहिरात फलक झाकले जात असल्याचे कारण पुढे करत संबंधित झाडे तोडण्यात आली. यासाठी महापालिका किंवा वन विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. नियमांची पायमल्ली करून हरित संपत्तीची कत्तल होत असताना संबंधित यंत्रणा मात्र मूकदर्शक असल्याची टीका नागरिक करत आहेत.

एकिकडे शहरात वृक्षारोपण मोहिमा राबवून लाखो रुपये खर्च केले जातात, पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले जातात, तर दुसरीकडे व्यावसायिक हितासाठी उभी झाडे तोडली जात असतील, तर अशा मोहिमांचा नेमका उपयोग काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही मजुरांना पैसे देऊन झाडे तोडण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे या प्रकारामागे नेमके कोण आहेत, झाडे तोडण्यास परवानगी कोणी दिली आणि संबंधितांवर काय कारवाई होणार, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, रस्त्यालगतची झाडे केवळ सौंदर्य वाढवत नाहीत, तर प्रदूषण नियंत्रण, तापमान कमी ठेवणे आणि नागरिकांना सावली देण्याचे महत्त्वाचे काम करतात. अशा झाडांची विनाकारण कत्तल ही पर्यावरण संरक्षणाच्या नियमांचे उल्लंघन ठरू शकते. महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी, संबंधित दुकानदार व मजुरांची चौकशी करावी, परवानगीशिवाय झाडे तोडली गेली असल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि झालेल्या पर्यावरणीय नुकसानीची भरपाई म्हणून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS