या ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून किनवट प्रादेशिक आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने बेंदी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत वृक्षलागवड आणि व

या ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून किनवट प्रादेशिक आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने बेंदी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत वृक्षलागवड आणि विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळकरी मुलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि वनअधिकारी-कर्मचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रोपवाटिका परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेतली. हा कार्यक्रम उपवन संरक्षक मनीषा पाटील, सहायक वनसंरक्षक (जकास व कॅम्पा) किनवट किरण चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) धीरज मदने आणि सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एच. संघई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी उपस्थित वनअधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ वृक्षलागवड करणे पुरेसे नसून, लावलेल्या झाडांचे संवर्धन आणि जतन करणे ही काळाची गरज आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून ते जगवावे. असे आवाहन केले. या पर्यावरणपूरक उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी वनविभागाच्या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात प्रामुख्याने वनपाल: दिनकर सूर्यवंशी, टी. ए. देवकते, बी. टी. जाधव, संजय कोम्पलवार.वनरक्षक गित्ते, बालाजी भुरके, बालाजी झंपलवाड, सुनील खामकर, रवी दांडेगावकर, केशव वानोळे, विठ्ठल मुळे, महेश भोरडे, ओम शिंदे. वाहन चालक: अनिल लाखाडे, अंकुश राठोड, वेद राठोड या कर्मचार्यांसह किनवट प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी, शिक्षक आणि मोठ्या संख्येने शाळकरी मुले या सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाली होती. निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

COMMENTS