Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हैसगाव ग्रामपंचायतीला राष्ट्रध्वज उतरविण्याचा विसर

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील म्हैसगाव ग्रामपंचायतीकडून १ मे २०२६ रोजी फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज वेळेत उतरविणे विसरल्याचा

संजीवनीच्या आठ विद्यार्थ्यांना तैवानमध्ये इंटर्नशिपची संधी
‘भीमशक्ती’ संघटनेकडून विद्यार्थ्यांना महापुरुषांची पुस्तके वाटप
मंथन परिक्षेत ऋग्वेद कारंजकर केंद्रात प्रथम 

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील म्हैसगाव ग्रामपंचायतीकडून १ मे २०२६ रोजी फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज वेळेत उतरविणे विसरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. मात्र दिवस उलटल्यानंतरही ध्वज खाली उतरविण्यात आला नाही. रात्री उशिरा एका जागरूक नागरिकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधितांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर अंधारात मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात घाईगडबडीत ध्वज उतरविण्यात आल्याचे समोर आले आहे.

या प्रकारामुळे ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन झाली असून हा राष्ट्रध्वजाचा अवमान की प्रशासनाचा निष्काळजीपणा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणार का, की प्रकरण दडपले जाणार, याबाबत गावात चर्चा रंगली आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याने संबंधित दोषींवर तातडीने योग्य कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS