कोपरगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपर

कोपरगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.माधव सरोदे व उपस्थितांनी वृक्षरोपण केले.
या उपक्रमात कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, प्रा. डॉ.चंद्रभान चौधरी, डॉ. संतोष पवार, डॉ. देविदास रणधीर, डॉ. बी. एम. वाघमोडे, प्रा. किरण पवार, प्रा. प्रदीप जगझाप, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी तसेच सर्वज्युनिअर व सिनियर विभागातील विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या वृक्षारोपण उपक्रमामुळे महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचणार आहे.

COMMENTS