खरवंडी कासार : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खरवंडी कासार परिसरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच

खरवंडी कासार : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खरवंडी कासार परिसरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून ढाकणवाडी येथे पुण्यतिथीचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरामध्ये विविध प्रकारच्या सावली देणाऱ्या आणि उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांमध्ये वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. ढाकणवाडी येथील या कार्यक्रमाला भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र जायभाय, अंबादास जायभाय, बाबूलाल ढाकणे, आसाराम ढाकणे, महादेव जायभाय, विठ्ठल जायभाय, नामदेव ढाकणे, बाबासाहेब ढाकणे, गणेश ढाकणे, अंबादास जायभाय आणि नवनाथ ढाकणे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेत्याला वृक्षारोपणासारख्या पवित्र कार्यातून आदरांजली वाहिल्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

COMMENTS