Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू 

देवळाली प्रवरा : टाकळिमियाँ येथील शेतमजुरीसाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. अनिता लक्ष्मण लाहुंडे (वय ४८, रा. टाकळीमिया) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अनिता लाहुंडे या नेहमीप्रमाणे शेतात मजुरीच्या कामासाठी जात होत्या. रेल्वे रुळ ओलांडत असताना त्यांना ऐकू येत नसल्यामुळे येणाऱ्या रेल्वेची चाहूल लागली नाही. कोणताही अंदाज न आल्याने भरधाव रेल्वेची जोरदार धडक बसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.  राहुरी पोलिसांनी आकस्मत मृत्यूची नोंद केली असून पो.हे.काँ.हनुमंत आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे.  विशेष बाब म्हणजे, दिवसभर कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेचा प्रवास मजुरीकडे निघून मृत्यूकडे वळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रेल्वे रुळ ओलांडताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

गौतम सहकारी बँकेस चार कोटींचा नफा  
‘समर्थ क्रॉप केअर’कडून कोट्यवधींची फसवणूक; वाढीव व्याजाचे आमिष; एजंट-गुंतवणूकदार हाणामारीनंतर प्रकार समोर
पारनेरमध्ये वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; पत्रे उडाले; गोठ्यांची पडझड; गारांनी झोडपले; शेतीचे नुकसान

देवळाली प्रवरा : टाकळिमियाँ येथील शेतमजुरीसाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. अनिता लक्ष्मण लाहुंडे (वय ४८, रा. टाकळीमिया) असे मृत महिलेचे नाव आहे.

शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अनिता लाहुंडे या नेहमीप्रमाणे शेतात मजुरीच्या कामासाठी जात होत्या. रेल्वे रुळ ओलांडत असताना त्यांना ऐकू येत नसल्यामुळे येणाऱ्या रेल्वेची चाहूल लागली नाही. कोणताही अंदाज न आल्याने भरधाव रेल्वेची जोरदार धडक बसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.  राहुरी पोलिसांनी आकस्मत मृत्यूची नोंद केली असून पो.हे.काँ.हनुमंत आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे.

 विशेष बाब म्हणजे, दिवसभर कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेचा प्रवास मजुरीकडे निघून मृत्यूकडे वळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रेल्वे रुळ ओलांडताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

COMMENTS