कर्जत : विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची कर्जत तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कार्यशाळा होणार आहे अशी माहिती पक्षाचे कर्जत मंडलाध्यक्ष अनिल गदादे यांनी दिली. भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी मंडलाध्यक्ष अनिल गदादे, ऍड. कैलासराव शेळके, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, आबा पाटील, नितीन खेतमाळीस , बापूराव शेळके, संपत बावडकर, काकासाहेब धांडे, लहू वतारे, दादासाहेब सोनमाळी, विनोद दळवी, प्रसाद ढोकरीकर, गणेश क्षीरसागर , निलकंठ शेळके, गणेश नलवडे, नंदलाल काळदाते, शरद मेहत्रे, काका ढेरे, पांडुरंग धीरसागर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत ६ एप्रिल रोजी होणाऱ्या पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. तसेच सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत चिंचोली काळदात येथील शिवमंगल कार्यालयामध्ये निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तसेच प्रभावी कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण, मिठाई वाटप व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार असे कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी घरावर पक्षाचा झेंडा लावून स्थापना दिवस साजरा करावा असे आवाहन मंडलाध्यक्ष अनिल गदादे यांनी केले.

कर्जत : विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची कर्जत तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कार्यशाळा होणार आहे अशी माहिती पक्षाचे कर्जत मंडलाध्यक्ष अनिल गदादे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी मंडलाध्यक्ष अनिल गदादे, ऍड. कैलासराव शेळके, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, आबा पाटील, नितीन खेतमाळीस , बापूराव शेळके, संपत बावडकर, काकासाहेब धांडे, लहू वतारे, दादासाहेब सोनमाळी, विनोद दळवी, प्रसाद ढोकरीकर, गणेश क्षीरसागर , निलकंठ शेळके, गणेश नलवडे, नंदलाल काळदाते, शरद मेहत्रे, काका ढेरे, पांडुरंग धीरसागर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत ६ एप्रिल रोजी होणाऱ्या पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. तसेच सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत चिंचोली काळदात येथील शिवमंगल कार्यालयामध्ये निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तसेच प्रभावी कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण, मिठाई वाटप व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार असे कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी घरावर पक्षाचा झेंडा लावून स्थापना दिवस साजरा करावा असे आवाहन मंडलाध्यक्ष अनिल गदादे यांनी केले.

COMMENTS