देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. याबाबत तहसीलदार, राहुरी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, द्राक्षे, आंबा, टरबूज, खरबूज व ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरांचे, शेडचे पत्रे, कांदा चाळ व जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले असून काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांनी पीक उत्पादनासाठी मशागत, बियाणे, खते, औषध फवारणी, खुरपणी व मजुरीवर मोठा खर्च केला होता. मात्र हाता-तोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या संकटामुळे नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शेतकरी सेना रविंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, शिवसेना शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, शिवराम बारकू कडू, साकलादी लक्ष्मण भोळे, किशोर मोहनराव येवले, संदीप भानुदास कदम, अनिल दामोदर उमाप, नारायण बर्डे, बाळासाहेब वाघ, नागेश विलास जाधव, ऍड. भाऊसाहेब पाटील पवार तसेच राहुरी तालुका वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब जाधव, अनिल जाधव आदींसह शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले.

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. याबाबत तहसीलदार, राहुरी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, द्राक्षे, आंबा, टरबूज, खरबूज व ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरांचे, शेडचे पत्रे, कांदा चाळ व जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले असून काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.
शेतकऱ्यांनी पीक उत्पादनासाठी मशागत, बियाणे, खते, औषध फवारणी, खुरपणी व मजुरीवर मोठा खर्च केला होता. मात्र हाता-तोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या संकटामुळे नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शेतकरी सेना रविंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, शिवसेना शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, शिवराम बारकू कडू, साकलादी लक्ष्मण भोळे, किशोर मोहनराव येवले, संदीप भानुदास कदम, अनिल दामोदर उमाप, नारायण बर्डे, बाळासाहेब वाघ, नागेश विलास जाधव, ऍड. भाऊसाहेब पाटील पवार तसेच राहुरी तालुका वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब जाधव, अनिल जाधव आदींसह शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले.

COMMENTS