Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानात अकोलेकरांनी सामील व्हावे ः पिचड

दि.31 ऑकटोबर रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथ येथे होणार अभियानाचा समारोप

अकोले/प्रतिनिधी : देशाच्या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि स्वातंत्रवीरांच्या योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान

कोरोनामुक्त गावांना लाखोंची बक्षिसे आणि योजनाही!
पाच लाखाची खंडणी मागितली, पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल
आईला सांभाळायचे कुणी…भावाचा भावावर कोयत्याने वार

अकोले/प्रतिनिधी : देशाच्या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि स्वातंत्रवीरांच्या योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केले आहे. अकोलेकरोनी व तालुक्यातील सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री वैभवराव पिचड यांनी केले.
        अकोले येथील हुतात्मा स्मारक मध्ये मेरी मिट्टी मेरा देश अभियानाची सुरवात वैभवराव पिचड यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव,जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली नाईकवाडी, अकोले तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमूख, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, प्रकाश नवले, रमेश राक्षे, आनंदराव वाकचौरे, आप्पासाहेब आवारी, उपस्थित होते.
 पिचड बोलताना म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमा निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून  देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम आहेत. दिल्लीत ’अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशातुन 7500 कलशांमध्ये माती घेऊन ’अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार आहे
   प्रास्तविकात अभियानाचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे बोलताना म्हणाले की, विविध गावागावांतून वसुधा वंदन कार्यक्रमातून जमा केलेली एक मूठ माती कलशामध्ये गोळा केली जाणार आहे. या कलशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव लिहून हा मातीचा कलश दिनांक 27 ते 30 ऑकटोबर 2023 या दरम्यान दिल्ली येथे नेला जाणार आहे. दि.31 ऑकटोबर 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे अभियानाचा समारोप समारंभ होणार आहे. यावेळी   भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, मेरी मिट्टी मेरा देश  या घोषणा नी परिसर दुमदुमला .
   यावेळी सुरेश खांडगे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सिताराम देशमुख, सोमदास पवार यांची भाषणे झाली. स्वागत यशवंत आभाळे, सूत्रसंचालन राहुल देशमुख यांनी तर आभार मच्छिन्द्र मंडलिक यांनी मानले. यावेळी दत्तात्रय देशमुख, संदीप शेटे, जगन देशमुख, संतोष बनसोडे, अरुण शेळके, गोकुळ कानकाटे, संतोष सोडनर, सचिन शेटे, परशराम शेळके,अनंत घाणे, धनंजय संत, भाऊ खरात, राजेंद्र देशमूख, शिवाजी आरज, अर्जुन गावडे, शाम वाळुंज, बाळासाहेब सावंत, अब्दुल इनामदार, सुभाष वाकचौरे, सुशांत वाकचौरे, नाजीम शेख, केशव बोडके, विकास देशमुख, चक्रधर सदगीर, राधाकिसन पोखरकर, अशोक आवारी,प्रतिभा मनकर, सिंधू बाई उंबरे, माधवी जगधने, साहेबराव दातखिळे, भरत घाणे, सी.बी.भांगरे, भाऊसाहेब शेटे, संतोष तिकांडे, राकेश देशमुख, सुरेश भांगरे, सुनील कोटकर, अमोल वैद्य, मधुकर बिबवे, दिलीप कोटकर, दिलीप हासे, दगडू हासे, शाम देशमुख, राहुल चव्हाण, विजय पवार, मोसीन शेख, नवनाथ मोहिते, गोकुळ वाघ, अविनाश तळेकर, अशोक देशमुख,   मुन्ना चासकर आदिसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
-प्रतिक्रिया ः आपल्या गावाची मातीमधून ही अमृतवाटिका उभी राहणार असून, राममंदिर उभारणीसाठी दिलेली विटेसाठी जी भावना आपली आहे.  अगदी तिच भावना आता अमृतवाटिकामध्ये असणार आहे.- भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा संयोजक.

COMMENTS