Homeताज्या बातम्या

“कुणबी प्रमाणपत्रे रद्द होताच एवढा आक्रोश का?”

ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके यांचा जरांगेंवर निशाणा सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्

पीक विमा व सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी हक्क मोर्चाचा लढा सुरूच; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन
साखर कामगारांनी काळानुरूप बदलणे गरजेचे: आ. आशुतोष काळे
पक्षंतराचा गुन्हा आता सन्मानाचे प्रतीक ठरतोय ! शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाचे निरीक्षण

ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके यांचा जरांगेंवर निशाणा

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोलापूरतील पत्रकार परिषदेत हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारसह ओबीसी समाजातील लोकप्रतिनिधींनाही भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या सद्यस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “राज्यात ओबीसींचे आरक्षण सुरक्षित आहे की नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे,” अशी मागणी त्यांनी केली. ओबीसी आरक्षणाच्या जागांवर मराठा-कुणबी समाजाचा मोठ्या प्रमाणावर वाटा गेल्याचा आरोप हाके यांनी केला. त्यामुळे मूळ ओबीसी समाजाच्या आरक्षणावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. जात पडताळणी समित्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर टीका करताना, प्रशासकीय यंत्रणांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे हाके म्हणाले. “महसूलमंत्र्यांना आम्ही मानत नाही, अशा प्रकारची भाषा वापरली जात असेल, तर ती लोकशाहीसाठी योग्य नाही. ही दहशतीची भाषा आहे,” असा आरोप त्यांनी केला. कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून हाके यांनी जरांगेंना लक्ष्य केले. काही कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर त्यावरून मोठ्या प्रमाणावर आंदोलन आणि आक्रोश केला जात असल्याचे ते म्हणाले. “कुणबी समाजाची काही प्रमाणपत्रे रद्द झाली म्हणून एवढा आक्रोश केला जातो; मग ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नावर समाजातील नेत्यांनी आता मौन सोडून स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचेही हाके यांनी सांगितले. सत्तेत असलेल्या अनेक लोकप्रतिनिधींनी स्वतःची ओबीसी म्हणून ओळख निर्माण केली आहे; मात्र प्रत्यक्षात मूळ ओबीसी समाजाच्या हक्कांचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“अपमानास्पद वक्तव्यांवर महाराष्ट्र गप्प का?”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर होत असलेल्या टीकेवरही हाके यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच महसूलमंत्र्यांच्या शारीरिक व्यंगावरून टिप्पणी करणेही चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या वक्तव्यांवर महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे समर्थक गप्प का आहेत, असा सवाल हाके यांनी केला. व्यक्तीच्या सामाजिक किंवा शारीरिक वैशिष्ट्यांवरून टीका करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी, “हा वर्णभेद नाही का?” असेही म्हटले.

COMMENTS