Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिंचनाच्या प्रश्नावर आ. रोहित पवार आक्रमक; सिंचन भवनात विविध प्रश्नांबाबत बैठक ; निधीची मागणी

 कर्जत : उन्हाच्या तीव्रतेमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होत असून आ. रोहित पवार यांनी या विषयावर शेतकऱ्यांसह पुण्यात सिंचन भवन येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कुकडी प्रकल्पाचे दुसरे उन्हाळी आवर्तन तातडीने सोडणे, सीना व विंचरणा नदीवरील बंधारे आणि तलावांची दुरुस्ती करणे आदींवर  सविस्तर चर्चा करण्यात आली.  यावेळी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव, संजीव चोपडे, सहाय्यक मुख्य अभियंता श्रीजित थोरात, सहाय्यक मुख्य अभियंता शिवाजी जाधव, पृथ्वीराज फाळके यांच्यासह अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी उपस्थित होते. सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे मतदारसंघात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कुकडीचे दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने आता तातडीने आवर्तनाचे नियोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. २५ मे पर्यंत कुकडीचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कुकडीच्या आवर्तनासोबतच सीना प्रकल्पातील लाभधारक शेतकरी आणि पिण्याचे पाणी यासाठी सीना प्रकल्पातूनही तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सीना प्रकल्पातील विविध कामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणीही या बैठकीत करण्यात आली.   याशिवाय बैठकीत कुकडी प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दाही जोरदारपणे मांडण्यात आला. विविध प्रलंबित कामांसाठी निधी देण्याची मागणीही यावेळी केली. दरम्यान, या सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. 

काँग्रेसच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील
शेअर बाजार फसवणूक प्ररकणी चौघांचा जामीन नाकारला 
अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात मोठा अनर्थ! अहिल्यानगरमध्ये प्रात्यक्षिकादरम्यान हँड ग्रेनेड फुटल्याने प्रचंड खळबळ

 कर्जत : उन्हाच्या तीव्रतेमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होत असून आ. रोहित पवार यांनी या विषयावर शेतकऱ्यांसह पुण्यात सिंचन भवन येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कुकडी प्रकल्पाचे दुसरे उन्हाळी आवर्तन तातडीने सोडणे, सीना व विंचरणा नदीवरील बंधारे आणि तलावांची दुरुस्ती करणे आदींवर  सविस्तर चर्चा करण्यात आली.

 यावेळी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव, संजीव चोपडे, सहाय्यक मुख्य अभियंता श्रीजित थोरात, सहाय्यक मुख्य अभियंता शिवाजी जाधव, पृथ्वीराज फाळके यांच्यासह अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे मतदारसंघात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कुकडीचे दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने आता तातडीने आवर्तनाचे नियोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. २५ मे पर्यंत कुकडीचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कुकडीच्या आवर्तनासोबतच सीना प्रकल्पातील लाभधारक शेतकरी आणि पिण्याचे पाणी यासाठी सीना प्रकल्पातूनही तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सीना प्रकल्पातील विविध कामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणीही या बैठकीत करण्यात आली. 

 याशिवाय बैठकीत कुकडी प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दाही जोरदारपणे मांडण्यात आला. विविध प्रलंबित कामांसाठी निधी देण्याची मागणीही यावेळी केली. दरम्यान, या सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. 

COMMENTS