Homeताज्या बातम्या

संसद परिसरात विरोधकांची निदर्शने लाठीमारप्रकरणी मंत्री अमित शहांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून सोमवारी संसद परिसरात विरोधकांनी जोरदार निदर्शने केली. काँग्रेसच्या खासदार प्रि

मनसे विद्यार्थी सेनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी ओम खेडकर यांची नियुक्ती; शासकीय विश्रामगृहात उत्साहात बैठक
आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनात सामील व्हा; राजू जोगदंड यांचे आवाहन
स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी-खांडे पारगाव शेतरस्ता; ५० वर्षांचा प्रश्न मार्गी

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून सोमवारी संसद परिसरात विरोधकांनी जोरदार निदर्शने केली. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी हातात फलक घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. या वेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

२० जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या पोलिसांच्या कारवाईबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. गृहमंत्र्यांनी सभागृहात भूमिका स्पष्ट करेपर्यंत हा मुद्दा सोडणार नसल्याचे प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले. संसद परिसरातील आंदोलनाचे पडसाद सभागृहाच्या कामकाजावरही उमटले. लोकसभेचे कामकाज सोमवारी सकाळी ११ वाजता सुरू झाल्यानंतर विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे कामकाज सुरुवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. राज्यसभेतही विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज सुरळीतपणे चालू शकले नाही. दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी १२ वाजता पुन्हा सुरू झाले; मात्र विरोधकांचा विरोध कायम राहिल्याने काही वेळातच दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. विद्यार्थ्यांवरील कारवाईबरोबरच अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरीला गेल्याचा आरोप, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यांसह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

विदेशी देणग्यांशी संबंधित कायद्यात सुधारणा करणारे विधेयक सरकार आणत असल्याचा दावा करत यादव यांनी त्यावरही प्रश्न उपस्थित केले. विविध संस्थांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न या कायद्यातील बदलांच्या माध्यमातून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यादव यांनी भारतीयांचा पैसा देशाबाहेर जाणार नसल्याच्या पूर्वीच्या आश्वासनाचा संदर्भ देत मोठ्या प्रमाणावर पैसा देशाबाहेर गेल्याचा आरोप केला. या आरोपांबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सरकारकडून आज लोकसभेत चार विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. त्यापैकी केरळच्या नावातील बदलाशी संबंधित विधेयक तसेच राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाशी संबंधित कायद्यात सुधारणा करणारे विधेयक गृहमंत्री अमित शहा मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांचा गोंधळ आणि सरकारचा विधायक कार्यक्रम यामुळे संसदेतील वातावरण तापले आहे.

अखिलेश यादवांकडून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनीही विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला धारातीरावर धरले. आंदोलकर्त्यांवर लाठीमार का करण्यात आला, अश्रूधुराचा वापर का करण्यात आला आणि आंदोलकांवर विद्युतप्रवाहाचा वापर केल्याचा आरोप केला जात आहे, याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सरकार प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी त्यापासून दूर जात असल्याचा आरोपही यादव यांनी केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील कारवाईसह महिला आरक्षण, मतदारसंघांची पुनर्रचना आणि विदेशी देणग्यांशी संबंधित कायद्यातील प्रस्तावित बदल या विषयांवरही त्यांनी सरकारवर टीका केली.

COMMENTS