मुंबई/सातारा : सिनेविश्वाला हादरवणारी बातमी समोर येत आहे. 'जोरू का गुलाम या सिनेमाचे दिग्दर्शक शकील नुरानी यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकर

मुंबई/सातारा : सिनेविश्वाला हादरवणारी बातमी समोर येत आहे. ‘जोरू का गुलाम या सिनेमाचे दिग्दर्शक शकील नुरानी यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणाचा गंभीर आरोप करण्यात आला होता. अभिनेत्रीवर अत्याचारप्रकरणी त्यांच्यावर मुंबईतील मालवणी पोलिसांनी ) गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच शकील नुरानी यांनी साताऱ्यातील रेंगडी येथील फार्महाऊस गाठले. अखेर तपासाची चक्रे फिरवत मेढा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, तसेच मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केले. या घटनेनंतर सिनेसृष्टीत अक्षरश: खळबळ उडाली.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एका 33 वर्षीय अभिनेत्रीने बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक शकील नुरानी यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला. तिने मुंबई येथील मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आगामी चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने नूरानी यांनी अभिनेत्रीला मालवणी येथील घरी बोलावून घेतलं. तसेच लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप अभिनेत्रीने दिग्दर्शकावर केला. तिला कथितरित्या नशेचे पदार्थ दिले. तसेच व्हिडीओद्वारे धमकावल्याचाही आरोप अभिनेत्रीने तक्रारीत केला.
अभिनेत्रीने तक्रार दाखल केल्यानंतर मालवणी पोलिसांनी शकील नुरानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच शकील नुरानी यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली. मालवणी पोलिसांना शकील नुरानी हे साताऱ्यातील रेंगडी गावातील एका फार्महाऊसमध्ये असल्याचे समजले. मालवणी पोलिसांनी तातडीने मेढा पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धीरजकुमार बेचके आणि शिवाजी डफळे या दोन्ही पोलिसांनी नुरानी यांच्या फार्महाऊसवर सिनेस्टाईल छापा टाकत ताब्यात घेतले.
मुंबई पोलिसांचे पथक मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाले. तसेच शकील नुरानी यांचा ताबा घेतला. मुंबई पोलिसांकडून सध्या पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, शकील नुरानी यांच्यावर पुढील कोणती कारवाई होणार? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शकील नुरानी नेमके आहेत तरी कोण? शकील नुरानी हे सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक. त्यांची दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ओळख आहे. त्यांना खरी ओळख ‘जोरू का गुलाम’ आणि ‘बडे दिलवाला’ या सिनेमांमुळे मिळाली. दरम्यान, या घटनेनंतर त्यांची पुन्हा चर्चा होऊ लागली. शकील नुरानी यांना अभिनेत्रीच्या लैंगिक छळ प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

COMMENTS