Homeताज्या बातम्या

झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज; अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न

रांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थ्यांनी सोमवारी विधानसभेकडे मोर्चा काढला. विद्यार्

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूरमध्ये रक्तदान शिबीर उत्साहात पारदर्शक
स्वावलंबी भारतासाठी कार्यकर्ताओंनी समाजात जनजागृती करावी-धनंजय धामणे
मेंढपाळांसाठी चराई क्षेत्र अन् गुन्हे मागे घेण्याबाबत धोरण ठरणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी  विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले ...

रांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थ्यांनी सोमवारी विधानसभेकडे मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या परिसरात धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्याने आंदोलनाला आक्रमक वळण मिळाले.

विद्यार्थ्यांना विधानसभेच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी काटेरी तारांचे अडथळे उभारले होते. तसेच गर्दी पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करण्यात आला. मात्र, आंदोलक विद्यार्थ्यांनी या अडथळ्यांवर चढून घोषणाबाजी आणि नाच सुरू केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला.

जयपाल सिंग मुंडा मैदानावर पाच हजारांहून अधिक विद्यार्थी जमा झाले होते. सकाळी विद्यार्थ्यांनी तिथून विधानसभेच्या दिशेने मोर्चा काढला. पोलिसांनी मार्गात काटेरी तारांचे अडथळे उभारून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही विद्यार्थ्यांनी हे अडथळे ओलांडत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. विधानसभेपासून सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरात पाण्याचा मारा करणारी वाहने तैनात करण्यात आली आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांना मागे हटवण्यासाठी पोलिसांनी या वाहनांद्वारे पाण्याचे फवारे सोडले. मात्र, त्यानंतरही विद्यार्थी मागे हटले नाहीत. काही आंदोलक पाण्याच्या फवाऱ्यांमध्ये नृत्य करताना दिसून आले. काही विद्यार्थ्यांनी पोलिसांनी उभारलेल्या अडथळ्यांवर चढून घोषणाबाजी केली. काटेरी तारांच्या कुंपणाजवळही विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांकडून त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू होते.

या आंदोलनाचे प्रमुख आंदोलक देवेंद्रनाथ महतो हे आमरण उपोषणावर आहेत. प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी रुग्णवाहिकेतून आंदोलनस्थळी उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अभिनेता पीयूष मिश्रा यांनी उपोषणस्थळी जाऊन देवेंद्रनाथ महतो यांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला.

झारखंड लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना अटक राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष एल. ख्यांगते यांना अटक केली आहे. जेपीएससीच्या १४व्या संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेतील अनियमिततेच्या चौकशीदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. आयोगाच्या कार्यालयावर २१ जुलै रोजी छापा टाकण्यात आल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्यांची सातत्याने चौकशी सुरू होती. परीक्षा प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

परीक्षांतील कथित अनियमिततेविरोधात संताप राज्य लोकसेवा आयोग आणि कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी दीर्घकाळापासून आंदोलन करत आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, कथित अनियमिततेची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशा मागण्या आंदोलकांकडून करण्यात येत आहेत. विधानसभेवर मोर्चा नेण्याच्या निर्धारामुळे रांचीतील परिस्थिती तणावपूर्ण झाली असून, विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात अडथळ्यांवरून वारंवार संघर्ष निर्माण होत आहे. पोलिसांकडून आंदोलकांना शांततेचे आवाहन करण्यात येत असले तरी विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

COMMENTS