Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केजमध्ये व्हॉलीबॉलचा धडाका! अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य स्पर्धा

केज : केज शहरात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा व्हॉलीबॉलचा थरार रंगणार आहे. पनगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते अक्षय भैय्या

बीडमध्ये बालविवाहाविरोधात पोलिसांची कारवाई; एकाच आठवड्यात तीन गुन्हे दाखल; वेषांतर करून विवाह थांबवला
सूर्यकांत काळे यांच्यासारख्या शिक्षकांची समाजाला गरज-खा.बजरंग सोनवणे;केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सेवागौरव सोहळा थाटात; शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
केजमध्ये खा.बजरंग सोनवणे यांनी अर्पण केली महामानवाला मानवंदना!
akshay mundada Archives | कार्यारंभ लाईव्ह

केज : केज शहरात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा व्हॉलीबॉलचा थरार रंगणार आहे. पनगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण शहरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने क्रीडाप्रेमींच्या उत्सुकतेला उधाण आले आहे.
अक्षय भैय्या मुंदडा यांचे खेळाप्रती असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. यापूर्वी त्यांनी विविध क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आता व्हॉलीबॉलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या लोकप्रिय खेळाला नवसंजीवनी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये खेळाची आवड वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या क्रीडा महोत्सवासाठी अक्षय भैय्या मित्र मंडळ (केज), पशुपतिनाथ दांगट आणि कबीर इनामदार यांनी पुढाकार घेतला आहे. आकर्षक बक्षिसांमुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली असून, या उपक्रमाला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले आहे. केज शहराला व्हॉलीबॉलचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. येथील अनेक खेळाडूंनी पोलीस दल, रेल्वे पोलीस, शिक्षण क्षेत्र व विविध शासकीय सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्पर्धेदरम्यान या ज्येष्ठ खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, त्यांच्या यशोगाथेतून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी हा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अकबर इनामदार, एत्तेशाम कादरी, प्रकाश मुंडे, सुनील घोळवे, खद्दिर कुरेशी आणि जिशान कादरी हे परिश्रम घेत आहेत. त्यांच्या नियोजनामुळे स्पर्धेबाबत खेळाडू आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. केजच्या क्रीडा परंपरेला उजाळा देणार्‍या या स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

COMMENTS