केज : केज पंचायत समिती कार्यालय परिसरातील संरक्षण भिंतीवरील डिजिटल बॅनर, होल्डिंगचे तात्काळ अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे ग

केज : केज पंचायत समिती कार्यालय परिसरातील संरक्षण भिंतीवरील डिजिटल बॅनर, होल्डिंगचे तात्काळ अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे ओम चादर यांच्यासह काही युवकांनी केली आहे. जर 8 दिवसात अतिक्रमण न काढल्यास बेमुदत आमरण करणार असल्याचा लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील संरक्षण भिंती लगत होर्डिंग बोर्ड, बॅनर लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातून पंचायत समिती कार्यालयात विविध कामासाठी येणार्या नागरिकांना सदरच्या अतिक्रमणामुळे पंचायत समिती कार्यालय दिसून येत नाही. सदर अतिक्रमणामुळे ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांना पंचायत समिती कार्यालय शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून पंचायत समिती कार्यालयाची भव्य दिव्य अशी इमारत बांधलेली आहे परंतु काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी बॅनर लावण्यासाठी मोठ-मोठे होल्डिंग उभे केलेले आहेत सदरच्या या होल्डिंग मुळे पंचायत समिती कार्यालय हे झाकून गेलेले आहे. सध्या पंचायत समिती कार्यालय हे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले आहे. सदरचे होल्डिंग वाले हे स्वतःच्या फायद्यासाठी शासनाची होल्डिंग व बॅनर लावण्यासाठी परवानगी न घेताच बेकायदेशीर रित्या सदर जागेचा वापर करत आहेत. सदर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण करून शासनाचा महसूल देखील बुडवला आहे त्यामुळे संबंधितावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सदरचे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. जर गटविकास अधिकारी यांनी सदरचे अतिक्रमण त्यांच्या स्तरावरून तात्काळ न काढल्यास व संबंधितावर कायदेशीर कारवाई न केल्यास आठ दिवसा नंतर पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे. या लेखी निवेदनावर ओम चादर, महेश पिंपळे, सतीश चांदणे, रोहन मस्के इत्यादींच्या स्वाक्षर्या आहेत.

COMMENTS