Homeताज्या बातम्याशहरं

श्री सिध्दनाथ देवी जोगेश्‍वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ

म्हसवड / वार्ताहर : राज्यातील अनेक भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्‍वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह

पोलीस नाईकास लाच घेताना रंगेहाथ पकडले
सोलापुरातील एनटीपीसी केंद्राकडून 525 मेगावॅटची वीजनिर्मिती सुरू
शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध; राष्ट्रवादी-14 तर भाजप 4 राष्ट्रवादीची सत्ता कायम

म्हसवड / वार्ताहर : राज्यातील अनेक भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्‍वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर शुक्रवार, दि. 5 पहाटे पाच वाजता मंदीरात श्री ची घटस्थापना करुन झाला.
कार्तिक प्रतिपदा ते मार्गशिर्ष महिन्यातील प्रतिपदा दरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीचा हा मंगलमय विविध धार्मिक उपक्रमांनी शाही विवाह सोहळा असतो.
दिपावली पाडव्यास शुक्रवार, दि. 5 रोजी घटस्थापना मंदीरामधील मुख्य गाभार्‍याबाहेरील मंडपातील श्री म्हातारदेव मुर्तीच्या समोर मंदीराचे सालकरी कृष्णात गुरव यांचे हस्ते व मंदीराचे पुजारी, मानकरी यांच्या उपस्थित झाली. त्यानंतर सकाळी दहा वाजता श्रींच्या ऊत्सव मुर्तीस हळदी लावण्याचा कार्यक्रम, श्रीच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त पारंपरिक पध्दतीने बारा दिवसाच्या नवरात्री सलग बारा दिवस उपवास समवेतच संपूर्ण नगरप्रदक्षणा उपक्रम पुजारी, मानकरी व भाविकांत सुरु होतो.
भाऊबिजेस शनिवार, दि. 6 रोजी सायंकाळी या शाही विवाह सोहळ्यानिमित्त येथील राज बागेतील श्री म्हातारदेव बाबा मंदीरात सालकरी मानकरी भेटीचा कार्यक्रम झाला. तुलसी विवाह दिवशी सोमवार, दि. 15 रोजी पहाटे पाच वाजता श्रीचे घट उठविणे व रात्री श्री चा विवाह सोहळा व या विवाह सोहळ्यानंतर शनिवार, दि. 27 रोजी काळभैरव अष्टमी (श्री चा जन्म उत्सव) रात्री नऊ वाजता देवदिवाळीस रविवार, दि. 5 डिसेंबर रोजी वधू-वराची रथातून वरात काढून या शाही विवाह सोहळ्याची सांगता करण्याची परंपरा आहे. कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे कुलुपबंद दरवाजे असलेली राज्यातील मंदीरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यास सरकारने परवानगी दिली. तरीही या परवानगीत कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी सुरक्षतेच्या दृष्टीने भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण राखण्याबाबतसुचनाचे काटेकोरपणे पालन करुन यंदाच्या श्री च्या शाही मंगल विवाह सोहळा पार पाडण्यात येणार असल्याची माहिती मंदीर ट्रस्टींनी सांगितले.

COMMENTS