केज : मागासवर्गीय महिलांवर वारंवार होणार्या मारहाणीच्या घटनांमध्ये पोलीस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप करत, केज येथे मंगळवारी (

केज : मागासवर्गीय महिलांवर वारंवार होणार्या मारहाणीच्या घटनांमध्ये पोलीस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप करत, केज येथे मंगळवारी (दि. 28 एप्रिल 2026) जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली.
या संदर्भात पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, गावखेड्यात मागासवर्गीय समाजालाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महिलांवर थेट हल्ले होत असताना गुन्हे दाखल करण्यास विलंब होतो, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (डउ/डढ -लीं) गुन्हे नोंदविण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना महिनोन्महिने अटक न होणे, तसेच पोलिसांच्या कारवाईतील दिरंगाई यावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने अधिक कठोर आणि तत्काळ भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागण्यांसाठी मंगळवार, दि. 28 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चामध्ये हजारो नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन साळवे, जिल्हा नेते हिराचंद काळे, अशोक सरवदे, धारूर तालुका अध्यक्ष राकेश शिरसट, दया वागमारे, दीपक ओव्हाळ, तुषार भालेराव, सूरज शिंदे आणि दिक्षा गायकवाड यांनी केले आहे.

COMMENTS