Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मार्च 2026 अखेरचे मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरण पत्र; ई-आर 1 सादर करण्याचे आवाहन

बीड : सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग/व्यवसाय/महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत

दुहेरी नागरिकत्व प्रकरणी राहूल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे हायकोर्टाचे आदेश
अंबाजोगाईत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव – आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पुस्तक न वाचता धमकी; संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करा-नितीन सोनवणे
शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक  सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी जिल्ह्यातील ...

बीड : सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग/व्यवसाय/महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका तसेच खाजगी क्षेत्रातील 25 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनांना त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्र (ई-आर 1) सादर करणे बंधनकारक आहे.
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सूचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व नियमावली 1960 नुसार, मार्च 2026 तिमाहीसाठीचे ई-आर 1 विवरणपत्र 30 एप्रिल 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. नियोक्त्यांसाठी ुुु.ीेक्षसरी.ारहरीुरूरा.र्सेीं.ळप  या पोर्टलवर ऑनलाइन विवरणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित नियोक्त्यांनी वेबसाईटवर जाऊन एाश्रिेूशी (ङळीीं र गेल) या पर्यायावर क्लिक करून, आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या मदतीने लॉगिन करावे. त्यानंतर एठ ठशिेीीं मधील ए-एठ 1 पर्याय निवडून माहिती ऑनलाइन सादर करावी. यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक (02442) 299116 वर संपर्क साधावा. तसेच राजू कटक (क.कौ.वि.मा. अ.) यांच्याशी मोबाईल क्रमांक 7020414231 वर संपर्क करता येईल. सर्व आस्थापनांनी आपल्या वेतन पटावरील मनुष्यबळाची संपूर्ण माहिती निर्धारित वेळेत सादर करणे आवश्यक असून, यात कसूर केल्यास संबंधित आस्थापनांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशी सूचना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त समाधान किरवले यांनी दिली आहे.

COMMENTS