Homeताज्या बातम्या

‘व्हायरल’ व्हिडिओने उघड केली शिस्तीची परीक्षाउमरीतील 2 पोलिसांचे निलंबन, नांदेड पोलिसांना स्पष्ट संदेश

उमरी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांच्या कथित अवैध वसुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस दलात केवळ दोन कर्म

अल्पवयीन मुलास मारहाण  
ट्युशन परिसरात गुंडगिरीचा थरार; बारावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्लालातूरमध्ये उपचार सुरू; प्रकृती चिंताजनक, तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
वाळू माफियांना संरक्षण प्रकरणी मोठी कारवाईपरभणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे नांदेड नियंत्रण कक्षात संलग्न



उमरी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांच्या कथित अवैध वसुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस दलात केवळ दोन कर्मचार्‍यांवर कारवाई झाली, एवढ्यावर ही घटना मर्यादित राहिलेली नाही. नव्याने पदभार स्वीकारलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी या प्रकरणात घेतलेली तातडीची भूमिका ही संपूर्ण पोलीस यंत्रणेसाठी ’शून्य सहनशीलते’चा (नशीे ढेश्रशीरपलश) स्पष्ट संदेश मानली जात आहे.
23 जून रोजी उमरी-धर्माबाद मार्गावर कर्तव्यावर असताना पोलीस हवालदार सुनील गोपाळराव कोलबुद्धे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद आवेज मोहम्मद मोईज यांनी काही वाहनधारकांकडून थेट वसुली केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांचे वर्तन पोलीस दलाच्या शिस्तीला बाधा आणणारे असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने 30 जून रोजी दोघांनाही निलंबित करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. या कारवाईचे महत्त्व केवळ निलंबनापुरते मर्यादित नाही. अनेकदा अशा प्रकरणांमध्ये चौकशीच्या नावाखाली विलंब होत असल्याची टीका होत असते. मात्र या प्रकरणात व्हिडिओ समोर आल्यानंतर अवघ्या काही दिवसांत झालेली प्रशासकीय कारवाई पोलीस दलाची प्रतिमा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलात शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी यांना प्राधान्य देण्याची भूमिका डॉ. निलाभ रोहन यांनी सुरुवातीपासूनच स्पष्ट केली आहे. उमरीतील कारवाई ही त्या भूमिकेची पहिली ठोस अंमलबजावणी मानली जात असून, पुढील काळात गैरवर्तन, भ्रष्टाचार किंवा अधिकाराचा गैरवापर करणार्‍या कोणत्याही कर्मचार्‍याला संरक्षण मिळणार नाही, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून गेला आहे. या घटनेने आणखी एक वास्तव अधोरेखित केले आहे. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक नागरिकाच्या हातातील मोबाईल हा केवळ संवादाचे साधन नसून सार्वजनिक उत्तरदायित्वाचे प्रभावी माध्यम बनला आहे. कोणतीही गैरकृत्ये काही क्षणांत समाजासमोर येऊ शकतात आणि त्यानंतर प्रशासनालाही तातडीने भूमिका घ्यावी लागते. उमरीतील कारवाईमुळे नांदेड पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी अधिक सतर्क झाल्याची चर्चा आहे. मात्र ही कारवाई एका घटनेपुरती न राहता, संपूर्ण पोलीस दलात प्रामाणिक आणि जनाभिमुख कार्यपद्धती रुजविण्याची सुरुवात ठरते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS