Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाल परीच्या टायरने मध्यरात्री घेतला अचानक पेट

प्रवासी थोडक्यात बचावले पिंपरी निर्मळजवळील घटना

राहाता/प्रतिनिधी ः पुणे-मनमाड या मार्गावर धावणारी लाल परी मध्यरात्री अडीच वाजेच्या दरम्यान, प्रवासी गाढ झोपेत असतांना, लाल परीच्या मागील टायरने अ

नेवासा तालुका जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी “भारतपुरी गोसावी” यांची निवड
कर्जत शहरातील चोर्‍या रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा अलर्ट
स्वस्तातील साखरेचा मोह पडला महागात, अडीच लाख लुटले

राहाता/प्रतिनिधी ः पुणे-मनमाड या मार्गावर धावणारी लाल परी मध्यरात्री अडीच वाजेच्या दरम्यान, प्रवासी गाढ झोपेत असतांना, लाल परीच्या मागील टायरने अचानक पेट घेतला. काही क्षणातच गाडीला आग लागल्याचे चालकाच्या अन वाहकाचे लक्षात आले. सर्व प्रवासी लालपरी तून सुखरूप खाली उतरवले अन्यथा.. त्यामुळे सर्व प्रवासी थोडक्यात बचावले, अन्यथा मोठ्या दुर्दैवी घटनेला सामोरे जाण्याची वेळ आली असती.
आग लागल्याची घटना समजताच राहाता नगरपालिकेचे अग्निशामक विभाग प्रमुख अशोक साठे आपल्या अग्निशामक पथकासह रात्री अडीच वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवले व काही क्षणात आटोक्यात आली. व आगीच्या भक्षस्थानी सापडून उद्धवस्त होणारी लालपरी सुद्धा वाचली. वाहन चालक वाहक व प्रवासी या सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास सोडला. याबाबतचे वृत्त असे की पुणे मनमाड ही लालपरी बस पुण्याहून मनमाड कडे जात असताना नगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्गावर पिंपरी निर्मख हद्दीतील हॉटेल विश्‍वदीप जवळ या गाडीचे मागील टायरला रात्री अडीचच्या सुमारास आग लागली होती. टायरने जोरदार पेट घेतला. आगीच्या ज्वाला निघत होत्या. दरम्यान बस मधील अनेक प्रवासी हे साखर झोपेत होते ही आग लागल्याची बाप चालकाच्या निदर्शनास येतात त्यांनी बसवर ताबा मिळवत बस एका कडेला थांबवली व तातडीने सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले तोच ही घटना दूरध्वनीवरून राहाता नगरपालिकेचे अग्निशामन विभागप्रमुख अशोक साठे व त्यांच्या सहकार्‍यांना समजली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता एवढ्या रात्री अग्निशामक घेऊन आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले व तातडीने टायरमुळे पेट घेतलेल्या बसची आग आटोक्यात आली, त्यामुळे लाल परी वाचलीच परंतु होणारी मोठी दुर्घटना सुद्धा टळली. एवढ्यावरच न थांबता अशोक साठे व त्यांच्या सहकार्‍यांनी लाल परीचे चालक व वाहक यांच्या मदतीने मध्यरात्रीच्या वेळी सर्व प्रवाशांना धीर देत या प्रवाशांना दुसर्‍या बसमध्ये बसवून दिल्यामुळे प्रवाशांचा पुढील प्रवास सुखकर झाला.

प्रवाशांनी मानले आभार – केवळ दैव बलवत्तर म्हणून मध्यरात्री संबंधित लाल परीचे चालक व राहत्याचे अग्निशामक पथक आमच्यासाठी देवदूत म्हणून आल्याची भावना व्यक्त करत प्रवाशांनी या सर्वांचे आभार मानत आपला पुढील प्रवास सुरू केला. मध्यरात्री लाल परीला लागलेली आग, त्यानंतर प्रवाशांना  पुढील प्रवास केव्हा होईल, की इथेच रोडवर जागावं लागेल अशा एक ना अनेक समस्या या प्रवाशासमोर भेडसावत होत्या, परंतु या सर्व समस्यातून मार्ग काढत त्यांना स्थानिकांनी व राहता नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने मोठी मदत केली ही मदत न विसरणारी असल्याचे बसच्या चालकाने सांगितले

आग विझवणे हे तर आमचे कर्तव्यच आहे, परंतु अगदी मध्यरात्री बसने पेट घेतल्याचा फोन येतो. कुठलाही विलंब न होता तात्काळ हा फोन रिसीव्ह केला जातो, आणि क्षणाचाही अवधी न दवडता माझे सहकारी प्रमोद बनकर चालक, गोरक्ष साळवे आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी जातो. आम्ही वेळीच गेल्याने शासनाच्या लाल परीच होणार मोठ नुकसान टळले तसेच प्रवाशांनाही आम्ही सुरक्षित बाहेर काढू शकलो, याचे समाधान आहे.  
अशोक साठे अग्निशामक विभागप्रमुख, राहाता

COMMENTS