Homeताज्या बातम्या

नवगण महाविद्यालयात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

नवगण महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्या

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा : मुख्यमंत्री फडणवीस
थकबाकीदारांसाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबवा; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश
नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन



नवगण महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश राठोड, माजी प्राचार्य डॉ. मधुकर आघाव, कार्यालय अधीक्षक श्री. नरेश साखरे तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. बबन मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. रमेश राठोड यांनी आपल्या भाषणात वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, कृषी विकासातील योगदानाचा तसेच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप गिर्‍हे
यांनी केले. उपस्थितांचे आभार माजी प्राचार्य डॉ. मधुकर आघाव यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS