Homeताज्या बातम्यादेश

तेलंगणात भारत राष्ट्र समितीच्या खासदारावर चाकू हल्ला

हैदराबाद ः तेलंगणामध्ये सत्ताधआरी भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचे खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर सोमवारी चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुन आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी
तलवाडा ते गेवराई रोडवर समोरा समोर दूचाकी धडक
कराड तालुक्यातून दोन वर्षांमध्ये 116 गुंड हद्दपार

हैदराबाद ः तेलंगणामध्ये सत्ताधआरी भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचे खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर सोमवारी चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान रेड्डी यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या रेड्डी यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातल्या सिद्धीपेट जिल्ह्यातील दौलताबाद मंडलातील सूरमपल्ली गावात निवडणूक प्रचारादरम्यान ही घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने खासदार कोठा प्रभाकर रेड्डी यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये रेड्डी यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खासदार रेड्डी यांना तात्काळ सिकंदराबादच्या रुग्णालयात नेण्यात आले. कोठा प्रभाकर रेड्डी हे तेलंगणातील मेडक मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रेड्डी यांच्यावर हल्ला करणार्‍याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. सिद्धीपेट पोलिस आयुक्त एन श्‍वेता यांनी सांगितले की, ’खासदार रेड्डी सुरक्षित आहेत. दौलताबाद मंडलातील सूरमपल्ली गावात ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी गजवेल येथे हलवण्यात आले आहे. सध्या आरोपी ताब्यात आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.

COMMENTS